“देवेंद्र फडणवीस त्यांच्या संपर्कात”, हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर महाजनांची भूमिका
भाजपा नेते हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. महाजन म्हणाले की, हर्षवर्धन पाटील यांच्या तुतारी हाती घेतल्याच्या अफवा आहेत. ते एका साखर कारखान्याच्या बैठकीसाठी पुण्यात होते. पाटील भाजपातच आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातील अडचणी सोडवल्या जातील. तसेच, जयंत पाटील यांच्या शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर महाजनांनी टीका केली.