मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार, छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “राजकीय दबाव…”
मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं. स्वराज्या पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मनोज जरांगे यांची भूमिका आणि समाजहिताच्या दृष्टीकोनातून घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं. जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलनाला मोठं पाठबळ मिळालं होतं.