काँग्रेसला पुन्हा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.
सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे.
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २७ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण आता अवघ्या सहा महिन्यांत ‘अबीर गुलाल’ मालिकेचा गाशा गुंडाळला जात आहे. त्यामुळे मालिकेचा प्रेक्षक वर्ग नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. अशातच मालिकेतील लाडकी शुभ्रा म्हणजे अभिनेत्री पायल जाधवने एक पत्र लिहिलं आहे; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. हा मतदारसंघ ठाकरे कुटुंबासाठी आणि महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचा होता. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आदित्य ठाकरे यांनी ८ हजार ४०८ मतांनी विजय मिळवला आहे. बातमी अपडेट होत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता खरातची मालिकेत एन्ट्री झाली. तिने अनुष्काची भूमिका साकारली आहे. मालिकेत अनुष्का पारूला मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे आता पारू अनुष्काचं ऐकून किर्लोस्कर घराला आणि आदित्यला सोडून जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकाबाजूला हे सर्व नाट्य घडतं असताना दुसऱ्याबाजूला पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणे आपल्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकतं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी महायुतीच्या विजयावर आनंद व्यक्त केला. त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर टीका केली आणि भाजप-शिवसेना नैसर्गिक युती असल्याचे म्हटले. तावडे यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा ठोकला आहे.
दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. सध्या अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर असून, महेश सावंत आघाडीवर आहेत. अमित यांनी विविध विकासकामांचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांना कमी जनसमर्थन मिळाले आहे.
'बिग बॉस १८'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं बदलली आहेत. दिग्विजय सिंह राठी 'टाइम गॉड' झाल्याने घरात तणाव वाढला आहे. विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि तजिंदर बग्गा यांनी कामं न करण्याचा बंड पुकारला आहे. सातव्या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले होते, त्यापैकी एक सदस्य घराबाहेर झाल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. अजित पवार महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवत आहेत आणि पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात आपल्या पुतण्याविरुद्ध विजय मिळवून आठव्यांदा विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर येत आहेत. भाजपाने १२५ जागा जिंकल्या असून महायुतीने १२२ जागा मिळवल्या आहेत. भाजपाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साद घातली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महायुतीला २२२ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत आणि ७ अपक्ष आमच्यासोबत येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या साथीने सत्ता स्थापन करण्याची गरज नाही.
झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहैत मतदारसंघातून २८१२ मतांनी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री चम्पाई सोरेन सराईकेला मतदारसंघातून आघाडीवर आहेत. झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत आहे. एक्झिट पोल्सनुसार भाजपाला ४२-२४, काँग्रेसला २५-३०, आणि इतरांना १-४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये ८१ जागांसाठी १२११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्याबरोबर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. वायनाडमध्ये काँग्रेसने तीनवेळा विजय मिळवला आहे. प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. १३ नोव्हेंबरला ६४.२४% मतदान झाले होते. काँग्रेसच्या एम. आय. शानवास यांनी २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवला होता. वायनाडमध्ये काँग्रेसचा प्रभाव कायम आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होत आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालापूर्वी सोन्याचे भाव दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, किमती वाढण्यामागचे खरे कारण म्हणजे रशिया- युक्रेन युद्ध. यानंतर देशातील सोन्याचे दर वाढू लागले आहेत. दरम्यान भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, देशातील सोन्या- चांदीचे दर उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत.
२३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी आठ वाजता मंत्रिपदाची शपथ घेतली, ज्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. मात्र, हे सरकार ८० तासांत कोसळले. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. आज पाच वर्षांनी, राज्यात निवडणुकीचा निकाल लागणार आहे, आणि २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही काही वेगळं घडतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. सध्या ऋतुजा ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता अंकित गुप्तासह प्रमुख भूमिकेत ऋतुजा झळकली आहे. अशातच तिला संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार २०२३’चा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Aai Kuthe Kay Karte: लोकप्रियतेचं शिखर गाठलेली ‘आई कुठे काय करते’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेली पाच वर्ष ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. त्यामुळेच अरुंधती महिलांसाठी आयडॉल झाली. या अरुंधती भूमिकेने मधुराणीला काय दिलं? जाणून घ्या…
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने २०० जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना संधी मिळाली. मतमोजणीच्या आधी बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. बाळा नांदगावकर म्हणाले की, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेसाठी ते फडणवीसांकडे गेले होते.
अभिनेता संदीप पाठकच्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मणराव देशपांडे लिखित 'वऱ्हाड निघालंय लंडनला' नाटकात संदीप ५२ व्यक्तिरेखा एकटा लीलया निभावत आहे. या नाटकातील त्याच्या अभिनयाचं चहूबाजूने कौतुक होतं आहे. सध्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' नाटकाचा अमेरिका दौरा सुरू आहे. या दौऱ्यातील प्रयोगाला देखील हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. याचे फोटो, व्हिडीओ संदीप पाठक सोशल मीडियावर शेअर करत आहे.
अमेरिकेत २३ वर्षीय भारतीय विद्यार्थी आर्यन रेड्डी याचा वाढदिवसाच्या दिवशी चुकून स्वतःवर गोळी झाडल्याने मृत्यू झाला. जॉर्जियातील अटलांटा येथे राहणारा आर्यन शिकारीची बंदूक स्वच्छ करताना ट्रिगर दाबल्याने त्याच्या छातीत गोळी लागली. मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी मृत घोषित केले. आर्यन कन्सास स्टेट विद्यापीठात मास्टर ऑफ सायन्सच्या दुसऱ्या वर्षांत शिकत होता.
Aai Kuthe Kay Karte: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’चा शेवटचा भाग ३० नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे. अखेर पाच वर्षांचा प्रवास आता संपणार आहे. त्यामुळे मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर आतापर्यंतच्या प्रवासाविषयी लिहिताना दिसत आहेत. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विशाखा म्हणजेच अभिनेत्री पुनम चांदोरकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राज्यातील निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अपक्ष आणि लहान पक्षांशी संपर्क साधला जात आहे. एक्झिट पोल्सनुसार महायुतीचं सरकार येण्याची शक्यता आहे, पण निकाल २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी सांगितलं की मुख्यमंत्री पदाचा निर्णय महाराष्ट्रातच होईल. त्यांनी भाजपावर टीका केली आणि २६ तारखेला सरकार स्थापन करण्याचा दावा केला.
Bigg Boss 18 २१ नोव्हेंबरला ‘टाइम गॉड’ होण्यासाठीचा दुसरा टास्क पार पडला. या टास्कमध्ये ‘टाइम गॉड’ होण्यासाठी उमेदवार असलेल्या पाच जणांना आपलं ठाम मत मांडायचं होतं. या टास्कमध्ये दिग्विजय सिंह राठीने बाजी मारली आणि तो सातव्या आठवड्यातील नवा ‘टाइम गॉड’ झाला आहे. दिग्विजयला ‘टाइम गॉड’ केल्याचा निर्णय विवियनाच्या टीमला पटलेला नाही. त्यामुळे विवियनसह अविनाश मिश्राने बंड केल्याचं पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांनी सांगितले की, राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि सर्वांचे लक्ष याकडे आहे. एक्झिट पोल्सनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे, परंतु महाविकास आघाडीने यावर विश्वास ठेवला नाही. संजय राऊतांनी १६० जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आणि २६ तारखेला सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी अपक्षांना मोठ्या रकमेच्या ऑफर दिल्याचा आरोप केला आणि आंबेडकरांच्या पाठिंब्याची शक्यता व्यक्त केली. भाजपाच्या अडथळ्यांवर मात करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल, असेही ते म्हणाले.
Reshma Shinde Kelvan: ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधील अभिनेत्री रेश्मा शिंदे आता आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. लवकरच रेश्मा लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच तिचं केळवण झालं. या केळवणाचे फोटो तिने स्वतः सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमसह सुयश टिळक, ऋतुजा बागवे यांनी रेश्माचं केळवण केलं. सध्या अभिनेत्रीच्या केळवणाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच तिच्या हटके एन्ट्रीचा व्हिडीओ समोर आला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीला सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता स्थापनेसाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, वंचित बहुजन आघाडीला संख्याबळ मिळाल्यास, जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतील.
गौतमी पाटील हिने आपल्या दिलखेच अदा आणि नृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. त्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा प्रमाणात आहे. म्हणून तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे प्रमाण आणि तिची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत आहे. अशी ही लोकप्रिय नृत्यांगना मराठी सिनेसृष्टीतही सक्रिय झाली आहे.
ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढल्यामुळे काही कार्यालयांमध्ये सुट्ट्या रद्द केल्या जातात. सोशल मीडियावर अशाच एका नोटीसचा फोटो व्हायरल झाला आहे, ज्यात २५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत सुट्ट्या रद्द केल्याचे नमूद आहे. नेटिझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या अनुभवांबद्दल सांगितले आहे, जसे की एका कंपनीत उन्हाळ्यात सुट्ट्या न देणे आणि कमी पगार देणे. तर काहींनी चांगले अनुभवही शेअर केले आहेत.
Vastu Tips For House: प्रत्येक घरात सहसा आरसा आणि घड्याळ असते. लोक या वस्तू आपल्या आवडीनुसार आणि जागा बघून घरातील भिंतींवर लावतात. पण, वास्तुशास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे. कारण वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला महत्त्व आहे, त्यामुळे जर तुम्ही घरामध्ये आरसा आणि घड्याळ चुकीच्या दिशेने लावले असेल तर त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत असतो; याने तुमच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार, घरातील कोणत्या दिशेच्या भिंतीवर आरसा आणि घड्याळ लावले पाहिजे जाणून घेऊ…
झोमॅटोने चिफ ऑफ स्टाफ पदासाठी पगाराशिवाय वर्षभर काम करण्याची आणि २० लाख रुपये भरण्याची अट ठेवली आहे. या पदासाठी १० हजार अर्ज आले आहेत. पात्रतेत भुकेला, संवेदनशील, नम्र, उत्साही आणि उत्तम संवादकौशल्य असणे आवश्यक आहे. पहिल्या वर्षानंतर ५० लाखांहून अधिक पगार दिला जाईल. अर्जदारांकडे पैसे असण्याबाबत विविध निरीक्षणे नोंदवली आहेत.