संजय राऊतांच्या टीकेवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड संतापले; म्हणाले, “एखादा पक्ष किंवा…”
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील घडामोडींना माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना जबाबदार ठरवले होते. चंद्रचूड यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत या आरोपांना उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या घटनात्मक विषयांवर निर्णय घेतले आहेत आणि न्यायालयाच्या कामात कोणताही पक्ष हस्तक्षेप करू शकत नाही. राऊतांनी चंद्रचूड यांच्यावर पक्षांतराच्या खिडक्या उघड्या ठेवल्याचा आरोप केला होता.