“८५+८५+८५ म्हणजे २७० हे गणित..”; देवेंद्र फडणवीसांचा मविआला टोला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुतीने १८२ आणि महाविकास आघाडीने १५८ जागा जाहीर केल्या आहेत. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी महाविकास आघाडीच्या गणिताची खिल्ली उडवली आणि महायुतीच्या २७८ जागांवर एकमत झाल्याचे सांगितले.