“उमेदवारी दिलेली नसताना ज्यांनी अर्ज भरलाय…”, बंडखोरांसाठी फडणवीसांचं मोठं विधान!
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून नाराजी आहे. अनेक निष्ठावान नेत्यांना संधी न मिळाल्याने बंडखोरी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, बंडखोरांना परत घेण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. रवी राजा भाजपात दाखल झाले. फडणवीसांनी प्रचाराची तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. गोपाळ शेट्टींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.