Devendra Fadnavis Said This Thing About Vote Jihad
1 / 30

देवेंद्र फडणवीसांचा आरोप, “४८ पैकी १४ लोकसभा मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद…”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील कणेरी मठ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना लोकसभा निवडणुकीत १४ मतदारसंघांमध्ये व्होट जिहाद झाल्याचा आरोप केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना कलम ३७० हटवण्याचे श्रेय मोदी आणि अमित शाह यांना दिले. फडणवीस यांनी लव्ह जिहादच्या घटनांवरही भाष्य केले आणि हिंदू मुलींना फसवून लग्न करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले.

Swipe up for next shorts
success story of Naga Naresh who lost his legs cracked iit jee and now working with google
2 / 30

अपघातात गमावले पाय पण जिद्द सोडली नाही; JEE परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या नागा नरेशचा प्रवास

प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात ते काही खोटं नाही. अथक प्रयत्न, मेहनत केली तर यश आपली पाठ नक्कीच थोपटतं. प्रत्येकाचं आयुष्यात काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत घेत असतो. कितीही अपयश आलं, संकटं आली तरी ती मागे टाकून सतत पुढे जाण्याची जिद्द आणि आशा त्याच्याकडे असली की सगळं काही शक्य होतं. अशाच संघर्षाला सामोरं जात आंध्र प्रदेशमधील एका लहानशा गावात राहणाऱ्या नागा नरेशचं आयुष्य अचानक पालटून गेलं.

Swipe up for next shorts
indira gandhi first election 1967
3 / 30

१९६७..इंदिरा गांधींची पहिली तर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची शेवटची निवडणूक; ५७ वर्षांपूर्वी..

'वन नेशन, वन इलेक्शन' या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, संसदेत यासंदर्भात विधेयक चर्चेला येईल. भारतात १९५२ ते १९६७ पर्यंत एकत्र निवडणुका होत होत्या. १९६७ नंतर ही पद्धत बंद पडली. १९६७ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठं आव्हान मिळालं. १९६९ मध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली.

Swipe up for next shorts
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan became emotional at the memory of Pandharinath Kamble
4 / 30

Video: “पॅडी दादा…” सूरज पंढरीनाथ कांबळेच्या आठवणीत झाला भावुक, म्हणाला, “मन भरून आलं…”

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील एक सदस्य ट्रॉफी जिंकणार आहे. नुकताच पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाल्यामुळे सूरज चव्हाण भावुक झाला आहे. त्याने जिद्दीने ट्रॉफी जिंकण्याचा निर्धार केला आहे. नेटकऱ्यांनी सूरजला भरभरून पाठिंबा दिला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Pallavi Vichare Wrote special post for pandharinath Kamble
5 / 30

“चांगल्या माणसाला कायमच…”, पंढरीनाथसाठी अंशुमन विचारेच्या पत्नीची खास पोस्ट; म्हणाली…

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात आता फक्त सात सदस्य उरले आहेत. नुकताच पंढरीनाथ कांबळे कमी मतांमुळे बाहेर पडला. त्याने सूरज चव्हाणला म्युच्युचल फंड कॉइनचा वारसदार म्हणून निवडले. अशातच अभिनेता अंशुमन विचारेची पत्नी पल्लवी विचारेने पंढरीनाथसाठी खास पोस्ट लिहिली, ज्यात तिने त्याच्या चांगुलपणाचे कौतुक केले.

Coldplay Bookmyshow
6 / 30

तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या सीईओंना दोनवेळा समन्स

जानेवारी २०२५ मध्ये नवी मुंबईत कोल्डप्ले बँडचा "म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५" कार्यक्रम होणार आहे. तिकीटांची विक्री काही मिनिटांतच संपली, ज्यामुळे बुक माय शोवर काळाबाजाराचा आरोप झाला. मुंबई पोलिसांनी बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांना समन्स पाठवले, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. बुक माय शोने काळाबाजाराशी संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

What is Decidophobia in Marathi | Symptoms treatment of Decidophobia
7 / 30

तुम्हाला काही ठरवताच येत नाहीये? गोंधळ उडतोय? वाचा काय आहे ‘डिसायडोफोबिया’?

FYI 4 hr ago

कधी तुम्हाला योग्य पर्याय निवडताना गोंधळ झाला आहे का? हे स्वाभाविक असू शकतं, पण वारंवार घडत असेल तर डिसायडोफोबिया असू शकतो. डिसायडोफोबिया म्हणजे निर्णय घेण्याची भीती. हा अँझायटी डिसॉर्डर, नैराश्य आणि कम्पल्सिव्ह डिसॉर्डरचा भाग असू शकतो. उपचारांसाठी मानसोपचार व औषधे आवश्यक असतात. निर्णयक्षमता सुधारण्यासाठी पर्यायांची यादी तयार करून फायदे-तोटे तपासावेत.

maruti suzuki alto price its in demand know specifications and features dvr 99
8 / 30

स्वस्तात मस्त! ‘या’ कारला बाजारात आहे मोठी मागणी, कमी बजेटमध्ये मिळेल फायदेशीर डील

ऑटो 5 hr ago

सणासुदीच्या हंगामात नवीन कार घेण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात; पण त्यापैकी कित्येकांना बजेटमुळे माघार घ्यावी लागते. पण, तुमच्या या लो-बजेटमध्येदेखील तुम्ही हाय-एण्ड फीचर्स असलेली कार खरेदी करू शकता.

दिवसेंदिवस मारुती सुझुकी अल्टोची पसंती वाढत चाललीय. भारतातील एक लोकप्रिय आणि विश्वासार्ह हॅचबॅक कार म्हणून मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) ओळखली जाते. आज आपण याच मारुती सुझुकी अल्टोच्या काही महत्त्वाच्या फीचर्सबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे वर्षाच्या बाराही महिने या कारला मागणी असते.

Justice Gawai over Laddu case
9 / 30

“जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!

तिरुपतीच्या श्री वेंकटेश्वर मंदिरातील लाडूंमध्ये निम्न दर्जाचे तूप आणि प्राण्यांची चरबी आढळल्याने वाद निर्माण झाला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले असून पाच याचिका दाखल झाल्या आहेत. न्यायमूर्ती गवई यांनी हास्यविनोद करत लाडूंच्या गुणवत्तेवर टिप्पणी केली. न्यायालयाने देवांना राजकारणापासून दूर ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. तुपाच्या भेसळीचे पुरावे मागवले असून तपासणी अहवालात नमुने प्रसादासाठी वापरले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Vishakha Subhedar First port after pandharinath Kamble elimination
10 / 30

पंढरीनाथ ‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यानंतर विशाखा सुभेदारची पहिली पोस्ट, म्हणाली…

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या अंतिम आठवडा सुरू झाला आहे. अंतिम आठवड्यात अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर आणि वर्षा उसगांवकर हे सात सदस्य पोहोचले आहेत. रविवारी पंढरीनाथ कांबळे कमी मतांमुळे घराबाहेर झाला. त्यानिमित्ताने विशाखा सुभेदारने पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

Karnataka man awarded death penalty for raping and killing
11 / 30

“चॉकलेटचं आमिष दाखवून उसाच्या शेतात नेलं अन्…”, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा!

गेल्या काही दिवसांपासून देशभरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कर्नाटकातील बेळगावी विशेष जलदगती न्यायालयाने तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या ३२ वर्षीय उद्दप्पा रामाप्पा गांगर याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, त्याला ४५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने मुलीच्या कुटुंबाला ३ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

daljeet kaur
12 / 30

पहिल्या लग्नापासून मुलगा, ८ महिन्यात मोडलं दुसरं लग्न; अभिनेत्रीला विकावं लागलं राहतं घर

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिल्या लग्नात अपयश आल्यावर तिने निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं, पण तेही वर्षभर टिकले नाही. निखिलपासून विभक्त झाल्यावर ती भारतात परतली आणि आर्थिक अडचणीत सापडली. तिने तिचं नऊ वर्षे जुनं घर विकलं. सध्या ती मुलाबरोबर नव्याने आयुष्य सुरू करतेय. दलजीतने यूट्यूबवर तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे.

supreme court on tirupati laddu row
13 / 30

“राजकारणापासून किमान देवांना तरी दूर ठेवा”, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; तिरुपती प्रकरणावर…

गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थानातील प्रसाद लाडूंच्या तुपात जनावरांची चरबी आढळल्याचा आरोप चर्चेत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, न्यायालयाने "देवांना राजकारणापासून दूर ठेवा" अशी टिप्पणी केली. तपास अहवालानुसार, भेसळयुक्त तूप प्रसादासाठी वापरले गेले नाही. न्यायालयाने केंद्र सरकारला चौकशीसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.

car accident airbags 2 year gorl died
14 / 30

कारच्या पुढच्या सीटवर चिमुकलीसह बसली होती महिला; अपघात झाला, एअरबॅग उघडली आणि मुलगी दगावली

भारतामध्ये अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या चिंताजनक आहे. केरळमध्ये एका अपघातात एअरबॅगमुळे २ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गाडीतील एअरबॅग्ज उघडल्यामुळे मुलीचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे एअरबॅग्जच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतर चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Israel Attack on Hezbollah
15 / 30

नसरल्लाहला मारण्यासाठी इस्त्रायलनं वापरला अमेरिकी बनावटीचा ९०० किलो वजनाचा बॉम्ब!

इस्रायलने दक्षिण बैरुतमधील हेजबोलाच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात हसन नसरल्ला ठार झाला. शनिवारी इस्रायली सैन्याने बैरुतवर जोरदार हवाई हल्ले केले, ज्यात नबिल कौक ठार झाला. अमेरिकन सिनेटर मार्क केली यांनी या हल्ल्यांसाठी ९०० किलो वजनाचा बॉम्ब वापरण्यात आल्याचा दावा केला. इस्रायलने हेजबोलाविरोधात आक्रमक कारवाई केली असून, हेजबोलाने उत्तर इस्रायलवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत.

Parvin Dabas Accident
16 / 30

“माझ्या मुलाला वाटलं मी मेलो”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला अपघाताचा घटनाक्रम

'मोहब्बतें' फेम अभिनेत्री प्रीती झांगियानीचा पती अभिनेता परवीन डबासचा २१ सप्टेंबर रोजी भीषण अपघात झाला. मुंबईतील वांद्रेतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये तो आयसीयूमध्ये होता, पण आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अपघाताच्या वेळी दोन मुलांनी त्याला मदत केली. परवीनने सांगितले की, अपघात गाडीच्या लाइट्समुळे झाला. त्याच्या पत्नीने या कठीण प्रसंगात खंबीरपणे साथ दिली, असं त्याने सांगितलं.

Maharashtra Declares Indigenous Cow As Rajmata-Gaumata in Cabinet Meeting
17 / 30

देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ घोषित, राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतला निर्णय!

महाराष्ट्र सरकारने देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि शासन आदेश जारी करण्यात आला. देशी गायींच्या संख्येत घट होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशी गायींच्या दुधाचे पौष्टिक मूल्य, आयुर्वेदिक चिकित्सा आणि सेंद्रिय शेतीत महत्त्व लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Tanned even after applying suscreen here is a Dermatologist suggestions
18 / 30

सनस्क्रीन लावूनही त्वचा होतेय काळपट? यामागचं नेमकं कारण काय? तज्ज्ञांनी केला खुलासा

आजकाल अनेकांनी आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये सनस्क्रीन वापरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, नियमित सनस्क्रीन वापरूनही अनेकांना टॅनिंग होते, अशी त्यांची तक्रार असते. यासंबंधी Indianexpress.com ने त्वचारोगतज्ज्ञांशी संवाद साधला आणि सनस्क्रीन वापरण्यातील सामान्य त्रुटी शोधल्या. संवादादरम्यान त्वचारोगतज्ज्ञांनी सनस्क्रीन वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हेदेखील स्पष्ट केलं.

Marathi Actress Akshaya Naik answer to trolls who body shaming
19 / 30

लठ्ठपणावरून ट्रोल करणाऱ्यावर अक्षया नाईक संतापली, मुंबई पोलिसांना टॅग करत म्हणाली…

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक सध्या चर्चेत आली आहे. चर्चेच कारण आहे ट्रोलिंग. लठ्ठपणावरून सतत ट्रोल करणाऱ्या एका व्यक्तीला तिने सोशल मीडियाद्वारे सडेतोड उत्तर दिलं आहे. अक्षयाची ही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

Who is Team India Ghajini Rohit Sharma Reveal The Name Suryakumar Yadav Reaction in Kapil Sharma Show Watch Video
20 / 30

“टीम इंडियाचा गजनी कोण?”, रोहितचं खरं उत्तर, तर सूर्याची प्रतिक्रिया पाहून आवरणार नाही हसू

टी-२० विश्वचषक २०२४ संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील काही खेळाडू नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये सहभागी होणार आहेत. रोहितसह सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे आणि अक्षर पटेल दिसणार आहेत. शोमध्ये खेळाडूंच्या दिलखुलासपणाची झलक पाहायला मिळेल. रोहितच्या विसरभोळेपणावर विचारलेल्या प्रश्नावर सर्वांनी हसून प्रतिक्रिया दिली. तिसरा एपिसोड ५ ऑक्टोबरला प्रसारित होईल.

Why Gold Price High in Marathi
21 / 30

सोन्याच्या किंमती इतक्या का वाढल्या आहेत? असं अचानक घडलंय तरी काय?

सोनं खरेदी सामान्य घरांसाठी मोठी कामगिरी असते. मागील वर्षभरात सोन्याच्या किमती ३०% वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर कपात केल्याने डॉलरची किंमत घटली आहे, त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. विविध देशांच्या केंद्रीय बँका डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोनं खरेदी करत आहेत.

Suraj Chavan post for Pandharinath Kamble eliminated
22 / 30

“माझा देव…पॅडी दादा”! घराबाहेर पडलेल्या पंढरीनाथ कांबळेसाठी सूरज चव्हाणची पोस्ट

बिग बॉस मराठीच्या नवव्या आठवड्यात सर्व आठ सदस्य नॉमिनेटेड होते. पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाला. त्याने सूरज चव्हाणला म्युचुअल फंड्सचे कॉइन्स दिले. सूरजने भावुक पोस्ट केली, "मी ट्रॉफी घेऊनच येनार." पंढरीनाथने सूरजचं पालकत्व घेतलंय असं सांगितलं. बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व ७० दिवसांत संपणार असून ६ ऑक्टोबरला ग्रँड फिनाले होणार आहे.

Flipkart Big Billion Days sale top 5 bike under 1 lakh
23 / 30

Flipkart Big Billion Days: बजेटची चिंता सोडा, १ लाखाच्या आत खरेदी करा या ‘बेस्ट ५’ बाईक्स

ऑटो 13 hr ago

Flipkart Big Billion Days | Bike under 1 lakh: फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये बाइक्सवर सवलतींचा पाऊस पडत आहे. फ्लिपकार्ट या बिग बिलियन डेज सेलमध्ये विविध पेमेंट स्किम्सवर ऑफर प्रदान करीत आहे. त्यात क्रेडिट आणि डेबिट कार्डवरील EMI पर्याय, विशेष कूपन ऑफर व बास्केट सूट यांचा समावेश आहे. एक लाख रुपयांच्या आत असलेल्या पेट्रोलवर चालणाऱ्या टॉप पाच मोटरसायकलींची यादी आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

What Eknath Shinde Said About Uddhav Thackeray?
24 / 30

एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, “माझी बाहुली हरवली म्हणणाऱ्या घरबशांना..”

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली. त्यांनी "गद्दारांना ५० खोके आणि लाडक्या बहिणींना फक्त १५०० रुपये?" असा सवाल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत, "दिल्लीला जाऊन मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा ही मागणी भीक असते," असे म्हटले. त्यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरही प्रतिक्रिया दिली.

Ankita Walawalkar Abhijeet Sawant Fight over nikki tamboli
25 / 30

Video: “तू सगळीकडे जेंटलमन बनून…”, अंकिता-अभिजीत सावंतमध्ये वादाची ठिणगी

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या शेवटच्या आठवड्यात अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांच्यात घरातील कामांच्या वाटपावरून जोरदार भांडण झाले. निक्की तांबोळीच्या कामावरून वाद निर्माण झाला. शोचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंढरीनाथ कांबळे एलिमिनेट झाल्यानंतर वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार हे सात स्पर्धक उरले आहेत.

Karan Veer Mehta lifts Khatron Ke Khiladi 14 trophy
26 / 30

Khatron Ke Khiladi 14: गश्मीर महाजनी, कृष्णा श्रॉफला हरवत करणवीर मेहराने जिंकला शो

स्टंट आधारित रिॲलिटी शो 'खतरों के खिलाडी १४' चा ग्रँड फिनाले रविवारी (२९ सप्टेंबर) पार पडला. रोहित शेट्टीने दिलेल्या कठीण टास्क आणि स्पर्धकांच्या अडचणींनंतर करणवीर मेहरा विजेता ठरला. फिनालेमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना 'जिगरा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. करणवीर मेहरा, गश्मीर महाजनी आणि कृष्णा श्रॉफ हे टॉप तीन स्पर्धक होते. करणवीरने ट्रॉफीसह एक कारही जिंकली.

arbaz patel post after nikki tamboli safe bigg boss marathi 5
27 / 30

Bigg Boss Marathi : निक्की सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात या आठवड्यात सर्व ८ सदस्य नॉमिनेटेड होते. प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी यांनी स्पर्धकांना डान्स टास्क दिला आणि सुरक्षित सदस्यांची घोषणा केली. सूरज चव्हाण व निक्की तांबोळी सुरक्षित झाले. अरबाज पटेलने इन्स्टाग्रामवर व्हॉइस नोट शेअर करून निक्कीला सुरक्षित केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आणि तिला फिनालेसाठी भरपूर वोट करण्याचं आवाहन केलं.

suraj chavan nikki tamboli safe bigg boss marathi 5
28 / 30

Bigg Boss Marathi: ८ नॉमिनेटेड सदस्यांपैकी ‘हे’ दोन स्पर्धक सुरक्षित

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेला एक आठवडा बाकी आहे. या आठवड्यात घरातील सर्व ८ सदस्य नॉमिनेटेड होते. गश्मीर महाजनी व प्राजक्ता माळी यांनी 'फुलवंती' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येऊन निक्की तांबोळी व सूरज चव्हाण सुरक्षित असल्याची घोषणा केली. होस्ट रितेश देशमुखच्या अनुपस्थितीत डॉ. निलेश साबळेंनी होस्टिंग केली. आता पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर यांच्यापैकी कोण घराबाहेर जाईल, ते लवकरच कळेल.

India vs Bangladesh Test Day 3 Play Called off Due to Wet Outfield Kanpur Match Headed Towards Draw
29 / 30

भारत-बांगलादेश दुसरी कसोटी ड्रॉ होणार? पाऊस नसतानाही तिसऱ्या दिवसाचा खेळ का केला रद्द?

क्रीडा September 29, 2024

भारत वि बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस कानपूरमध्ये पावसामुळे रद्द करण्यात आला. पाऊस नसतानाही आऊटफिल्ड ओली असल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. शनिवारीही पावसामुळे खेळ रद्द झाला होता. ग्रीन पार्क स्टेडियममधील खराब ड्रेनेज सिस्टीममुळे मैदानावरील पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. आता दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून, सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Fame Ankita Prabhu Walawalkar First Job And Payment
30 / 30

अंकिता वालावलकरने मुंबईत ‘या’ ठिकाणी केली होती पहिली नोकरी, किती होता पगार? जाणून घ्या…

मनोरंजन September 29, 2024

‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने लोकप्रिय असणारी कोकण कन्या अंकिता वालावलकरने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. खेळाने आणि नवनवीन स्ट्रॅटजीने अंकिताने प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिताची पहिली नोकरी आणि पहिला पगार काय होता? जाणून घ्या…