“त्यांनी नवीन वडील शोधलेत”, धर्मराव बाबा अत्राम यांची लेकीवर आगपाखड; म्हणाले, “मी त्यांना
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांनी मुलगी भाग्यश्री अत्राम यांच्यावर टीका केली आहे. भाग्यश्री याांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने धर्मराव यांनी त्यांना खोचक शुभेच्छा दिल्या. त्यांनी भाग्यश्री यांच्या भाषेवर टीका करताना, त्यांना शिकवण्यात कमी पडल्याचं विधान केलं. तसेच, त्यांनी ५० वर्षं लोकांसाठी काम केल्याचे सांगून, भाग्यश्री यांच्या नव्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.