आचारसंहितेचं उल्लंघन! भाजपा आणि काँग्रेसच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाकडून नोटीस
महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. भाजपाने राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती, तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात तक्रार केली होती. दोन्ही पक्षांना १८ नोव्हेंबरपर्यंत उत्तरे मागवली आहेत. महाराष्ट्रात २८८ आणि झारखंडमध्ये ३८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे.