हरियाणातील चित्र स्पष्ट; सावित्री जिंदाल, विनेश फोगट यांच्यासह विजयी उमेदवारांची यादी!
हरियाणा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅट्रिक साधत एकहाती सत्ता मिळवली आहे. शेतकरी आणि खेळाडूंच्या आंदोलनाचा लोकसभेवर परिणाम झाला असला तरी विधानसभेत भाजपाने बहुमत मिळवले. ९० जागांसाठी १०३१ उमेदवार रिंगणात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणाच्या जनतेने तिसऱ्यांदा भाजपावर विश्वास टाकल्याचे सांगितले. हरियाणाच्या निकालाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पडण्याची शक्यता आहे.