“छत्रपती शिवरायांना लुटारु म्हणणं शरद पवारांना मान्य आहे का?”, देवेंद्र फडणवीसांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली नव्हती, असे विधान केले होते. यावर टीकेला उत्तर देताना त्यांनी शिवाजी महाराजांनी मुघलांचा खजिना वसूल केला होता, लूट नव्हती असे स्पष्ट केले. तसेच, लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशातून प्रेरित असल्याचे सांगितले. शरद पवारांना महाराजांना लुटारू म्हणणे मान्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.