rajesaheb deshmukh
1 / 30

“निवडून आलो तर पोरांची लग्ने लावून देईन”, असं आश्वासन देणाऱ्या उमेदवाराचं काय झालं?

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख ९४ हजार ८८९ मते मिळाली, तर राजेसाहेब देशमुख यांना ५४ हजार ६६५ मते मिळाली. राजेसाहेब देशमुख यांनी तरुणांना लग्न आणि नोकरीचे आश्वासन दिले होते, ज्यामुळे त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र, त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे.

Swipe up for next shorts
Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates in Marathi (2)
2 / 30

Video: लाभार्थीकरण, धर्माची फोडणी आणि चमचमीत यश; गिरीश कुबेरांनी सांगितली निवडणूक ‘रेसिपी’

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल जाहीर झाले असून महायुतीने २३५ जागांवर विजय मिळवला आहे. मविआला ४९ जागा मिळाल्या तर अपक्ष व इतर पक्षांना ४ जागा मिळाल्या. गिरीश कुबेर यांनी महायुतीच्या विजयामागे तीन 'C' - Cash, Cast, Communalism यांचा मोठा वाटा असल्याचे विश्लेषण केले. महिलांना रोख रक्कम, जातीय समीकरणे आणि धार्मिक ध्रुवीकरण यामुळे महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले.

Swipe up for next shorts
Ladki Bahin Yojana
3 / 30

मतदान झालं, निकाल लागला; लाडक्या बहिणींना आता पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा!

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच दिले गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्ये देण्याचे आश्वासन दिले आहे. योजनेमुळे मतदानात वाढ झाली असून, महिलांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे.

Swipe up for next shorts
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar Discussion
4 / 30

“आणखी एक आमदार आला”, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना सांगत मारला डोक्यावर हात

महाराष्ट्रात महायुतीने २३६ जागा जिंकून अभूतपूर्व विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या कामगिरीचं कौतुक केलं. विजयानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राचे आभार मानले. पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पाटील यांच्या विजयाची बातमी दिली, ज्यावर तिघांनी मिश्किल संवाद साधला. हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

bjp candidate winners list
5 / 30

भाजपाचा विजयरथ १६ ठिकाणी रोखणारे ‘ते’ उमेदवार कोण? ११ ठिकणी काँग्रेसशी झाली थेट लढत!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३५ जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला फक्त ४९ जागा मिळाल्या आहेत. भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपाच्या १६ उमेदवारांचा पराभव झाला असून त्यात ११ काँग्रेसचे, २ शिवसेना (उद्धव ठाकरे), २ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि १ माकपचा उमेदवार आहे. या निकालांमुळे सत्तासमीकरणं बदलली आहेत.

Eknath Shinde
6 / 30

मुख्यमंत्री शिंदे यांची विजयी आमदारांबरोबर बैठक, मित्र पक्षाबरोबर चर्चा करण्याबाबत निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली महायुतीला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. शिवसेनेतून ५७ पैकी ५६ उमेदवार विजयी झाले. शिंदे यांना सत्तास्थापनेबाबत सर्वाधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. महायुतीला २३० जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला ५६ जागा मिळाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, वानखेडे स्टेडियमवर शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Assembly Election Results Candidates Who Won By the Highest and Lowest Margin
7 / 30

भाजपाच्या ‘या’ उमेदवाराने मिळवला बलाढ्य विजय, तर AIMIM उमेदवाराला ७५ मतांनी तारलं!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भाजपाला १३० हून अधिक जागा मिळाल्या असून महायुती पुन्हा सत्तेत येण्यास सज्ज आहे. शिरपूर मतदारसंघात भाजपाचे काशिराम पावरा १ लाख ५९ हजार ४४ मतांनी विजयी झाले. मालेगाव दक्षिण मतदारसंघात मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक ७५ मतांनी विजयी झाले. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रे ३७७ मतांनी आणि बुलढाण्यात संजय गायकवाड ८४१ मतांनी विजयी झाले.

wayanad bypoll election results 2024 priyanka gandhi Post
8 / 30

वायडनाडमधील दणदणीत विजयाचं श्रेय प्रियांका गांधींनी कोणाला दिलं? म्हणाल्या, “संसदेत…”

केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना जवळपास चार लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. या विजयानंतर प्रियंका गांधी वाड्रा यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वायनाडच्या लोकांचे आभार मानले आहेत. वायनाडमधील लोकांनी बहुमोल मत दिल्याबद्दल आणि विश्वास ठेवल्याबद्दल प्रियांका गांधी यांनी मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray On Maharashtra Election Result 2024
9 / 30

“हा टोमणा नाहीय, पण अस्सल भाजपाचा …”, मविआचा पराभव स्वीकारत उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

राज्यात महायुतीची लाट असून भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीला फक्त ५५ जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून मतदारांना उपरोधिक प्रश्न विचारले आणि भाजपावर टीका केली. त्यांनी जनतेला निकाल मान्य नसेल तर लढत राहण्याचं आश्वासन दिलं. तसेच, महागाई आणि इतर मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले.

Kinshuk Vaidya Wedding
10 / 30

‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू अडकला लग्नबंधनात, मराठी रितीरिवाजानुसार झालं लग्न

Kinshuk Vaidya Wedding: ‘स्टार प्लस’वरील ‘शाका लाका बूम बूम’ या मालिकेने त्याकाळी लहान मुलांना अक्षरशः वेड लावलं होतं. या मालिकेतील संजू आणि त्याची जादू पेन्सिलने लहानांना आकर्षित केलं होतं. ‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजू म्हणजेच अभिनेता किंशुक वैद्य आता मोठा झाला असून लग्नबंधनात अडकला आहे. किंशुकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

EKNATH SHINDE Maharashtra
11 / 30

जनतेच्या दरबारी ‘शिवसेने’चा निकाल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “असली – नकलीमध्ये…”

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवला आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) ५६ आणि राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार) ४० जागांवर आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जनतेचे आभार मानले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेची शिवसेनेला लोकांनी कौल दिला असल्याचे सांगितले. जनतेने महायुतीवर दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी साष्टांग दंडवत घालून आभार मानले.

Rohit Patil WonTasgaon Kavathe Mahankal Election as Youngest Candidates
12 / 30

महाराष्ट्राला मिळाला सर्वात कमी वयाचा आमदार; एकेकाळी वडील होते गृहमंत्री

सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली. या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. पण, अखेर या मतदारसंघातील निकाल जाहीर झाला असून राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत आता सर्वात कमी वयाचा उमेदवार लोकांचे प्रश्न मांडताना दिसणार आहे.

abeer gulal fame Payal Jadhav write letter after serial off air
13 / 30

“अथक मेहनत करून…”, सहा महिन्यांत बंद होणाऱ्या ‘अबीर गुलाल’मधील अभिनेत्रीचं पत्र

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अबीर गुलाल’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार यांची प्रमुख भूमिका असलेली ही मालिका २७ मेपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. पण आता अवघ्या सहा महिन्यांत ‘अबीर गुलाल’ मालिकेचा गाशा गुंडाळला जात आहे. त्यामुळे मालिकेचा प्रेक्षक वर्ग नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. अशातच मालिकेतील लाडकी शुभ्रा म्हणजे अभिनेत्री पायल जाधवने एक पत्र लिहिलं आहे; ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

aaditya thackeray
14 / 30

आदित्य ठाकरेंनी गड राखला; वरळीतून मिलिंद देवरांचा दारुण पराभव!

वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. हा मतदारसंघ ठाकरे कुटुंबासाठी आणि महाविकास आघाडीच्या प्रतिष्ठेसाठी महत्त्वाचा होता. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात आदित्य ठाकरे यांनी ८ हजार ४०८ मतांनी विजय मिळवला आहे. बातमी अपडेट होत आहे.

Prithviraj chavan
15 / 30

काँग्रेसला पुन्हा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.

paaru fame Sharayu Sonawane dance on shraddha Kapoor song watch video
16 / 30

श्रद्धा कपूरच्या गाण्यावर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेनेच्या लावणीचा ठसका; पाहा व्हिडीओ

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्वेता खरातची मालिकेत एन्ट्री झाली. तिने अनुष्काची भूमिका साकारली आहे. मालिकेत अनुष्का पारूला मॉडलिंगमध्ये करिअर करण्याचा सल्ला देत आहे. त्यामुळे आता पारू अनुष्काचं ऐकून किर्लोस्कर घराला आणि आदित्यला सोडून जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. एकाबाजूला हे सर्व नाट्य घडतं असताना दुसऱ्याबाजूला पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणे आपल्या जबरदस्त डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकतं आहे.

Vinod Tawade Maharashtra Vidhan sabha election 2024
17 / 30

महायुतीचा विजय दृष्टीपथात येताच विनोद तावडेंची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २२० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी महायुतीच्या विजयावर आनंद व्यक्त केला. त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर टीका केली आणि भाजप-शिवसेना नैसर्गिक युती असल्याचे म्हटले. तावडे यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सुप्रिया श्रीनेत यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा बदनामीचा दावा ठोकला आहे.

Amit Thackeray Dadar Mahim Vidhan Sabha Constituency
18 / 30

राजपुत्र पिछाडीवर; उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला जायंट किलर!

दादर-माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे गेले. त्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. सध्या अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर असून, महेश सावंत आघाडीवर आहेत. अमित यांनी विविध विकासकामांचे आश्वासन दिले होते, परंतु त्यांना कमी जनसमर्थन मिळाले आहे.

Bigg Boss 18 alice Kaushik is evicted from salman khan show
19 / 30

Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात कोणता सदस्य एलिमिनेट झाला? जाणून घ्या…

'बिग बॉस १८'मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील समीकरणं बदलली आहेत. दिग्विजय सिंह राठी 'टाइम गॉड' झाल्याने घरात तणाव वाढला आहे. विवियन डिसेना, अविनाश मिश्रा आणि तजिंदर बग्गा यांनी कामं न करण्याचा बंड पुकारला आहे. सातव्या आठवड्यात सात सदस्य नॉमिनेट झाले होते, त्यापैकी एक सदस्य घराबाहेर झाल्याचं समोर आलं आहे.

Baramati Election Results, ajit pawar Yugendra pawar
20 / 30

Video : बारामतीत निकालाआधीच अजित पवार समर्थकांनी उधळला विजयाचा गुलाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. अजित पवार महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवत आहेत आणि पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात आपल्या पुतण्याविरुद्ध विजय मिळवून आठव्यांदा विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.

Uddhav Thackery chandrakant Patil
21 / 30

सत्तेच्या जवळ पोहोचताच भाजपाची उद्धव ठाकरेंना साद; मोठ्या नेत्याचं विधान चर्चेत!

राज्यात विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर येत आहेत. भाजपाने १२५ जागा जिंकल्या असून महायुतीने १२२ जागा मिळवल्या आहेत. भाजपाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला साद घातली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, महायुतीला २२२ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत आणि ७ अपक्ष आमच्यासोबत येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या साथीने सत्ता स्थापन करण्याची गरज नाही.

Jharkhand Election Results 2024 Live Updates
22 / 30

झारखंडमध्ये आजी-माजी मुख्यमंत्री आघाडीवर, JMM आणि भाजपामध्ये अटीतटीची लढत!

झारखंड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन बरहैत मतदारसंघातून २८१२ मतांनी आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री चम्पाई सोरेन सराईकेला मतदारसंघातून आघाडीवर आहेत. झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये लढत आहे. एक्झिट पोल्सनुसार भाजपाला ४२-२४, काँग्रेसला २५-३०, आणि इतरांना १-४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये ८१ जागांसाठी १२११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

Priyanka Gandhi waynad bypoll election 2024
23 / 30

वायनाडमध्ये काँग्रेस राखणार का गड? प्रियांका गांधीची प्रतिष्ठा पणाला!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्याबरोबर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. वायनाडमध्ये काँग्रेसने तीनवेळा विजय मिळवला आहे. प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. १३ नोव्हेंबरला ६४.२४% मतदान झाले होते. काँग्रेसच्या एम. आय. शानवास यांनी २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवला होता. वायनाडमध्ये काँग्रेसचा प्रभाव कायम आहे.

Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
24 / 30

महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होत आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालापूर्वी सोन्याचे भाव दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, किमती वाढण्यामागचे खरे कारण म्हणजे रशिया- युक्रेन युद्ध. यानंतर देशातील सोन्याचे दर वाढू लागले आहेत. दरम्यान भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, देशातील सोन्या- चांदीचे दर उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत.

early Morning oath taking by ajit pawar and devendra fadnavis
25 / 30

पहाटेच्या शपथविधीला पाच वर्षं पूर्ण; निकालाच्या दिवशी ‘त्या’ राजकीय सत्तानाट्याची चर्चा!

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी आठ वाजता मंत्रिपदाची शपथ घेतली, ज्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला. मात्र, हे सरकार ८० तासांत कोसळले. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. आज पाच वर्षांनी, राज्यात निवडणुकीचा निकाल लागणार आहे, आणि २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही काही वेगळं घडतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

jaswand flower will grow faster homemade khat of banana peel and lemon gardening tips
26 / 30

जास्वंदीला येतील भरपूर कळ्या, केळीच्या सालीबरोबर मिसळा ही गोष्ट

आपल्या बाल्कनीची शोभा वाढविण्यासाठी आपण विविध प्रकारची रोपं लावतो आणि मग ती रोपं चांगल्या रीतीनं बहरावीत यासाठी रोज काही ना काही उपाय करीत असतो. पण, तुम्ही हे काम जर योग्य पद्धतीनं केले नसेल, तर या मेहनतीचा फार काही उपयोग होतोच असं नाही. विशेषतः फुलझाडांसाठी महागड्या खतांची गरज नसते; तर तुम्ही अगदी घरगुती पद्धतीनेसुद्धा खत तयार करून रोपांना बहर आणू शकता.

Rutuja Bagwe
27 / 30

ऋतुजा बागवेला मिळाला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, पोस्ट करत ट्रोलर्सचे मानले आभार

मनोरंजन November 22, 2024

नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. सध्या ऋतुजा ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत अभिनेता अंकित गुप्तासह प्रमुख भूमिकेत ऋतुजा झळकली आहे. अशातच तिला संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार २०२३’चा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासंदर्भात तिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Aai kuthe kay karte What did the role of Arundhati give Madhurani Prabhulkar
28 / 30

अरुंधती या भूमिकेने तुला काय दिलं? याचं उत्तर देताना मधुराणीचे डोळे पाणावले, म्हणाली…

Aai Kuthe Kay Karte: लोकप्रियतेचं शिखर गाठलेली ‘आई कुठे काय करते’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ३० नोव्हेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. गेली पाच वर्ष ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन केलं. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका उत्कृष्टरित्या साकारली. त्यामुळेच अरुंधती महिलांसाठी आयडॉल झाली. या अरुंधती भूमिकेने मधुराणीला काय दिलं? जाणून घ्या…

Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
29 / 30

बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेने २०० जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांना संधी मिळाली. मतमोजणीच्या आधी बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आणि निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. बाळा नांदगावकर म्हणाले की, आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मुलाच्या लग्नपत्रिकेसाठी ते फडणवीसांकडे गेले होते.

America 90 year old grandmother praised Sandeep Pathak after watch Varhad Nighalay Londonla play
30 / 30

अमेरिकेच्या ९० वर्षांच्या आजीनं पाहिलं संदीप पाठकचं ‘वऱ्हाड…’ नाटक, कौतुक करत म्हणाल्या…

मनोरंजन November 22, 2024

अभिनेता संदीप पाठकच्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. लक्ष्मणराव देशपांडे लिखित 'वऱ्हाड निघालंय लंडनला' नाटकात संदीप ५२ व्यक्तिरेखा एकटा लीलया निभावत आहे. या नाटकातील त्याच्या अभिनयाचं चहूबाजूने कौतुक होतं आहे. सध्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' नाटकाचा अमेरिका दौरा सुरू आहे. या दौऱ्यातील प्रयोगाला देखील हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. याचे फोटो, व्हिडीओ संदीप पाठक सोशल मीडियावर शेअर करत आहे.