“हिमाचलच्या कुशीत जन्म पण महाराष्ट्राने…” नागपुरातील सभा कंगना रणौत यांनी गाजवली!
कंगना रणौत नागपुरात: महाराष्ट्रातील निवडणुकांच्या प्रचारासाठी अनेक केंद्रीय नेते राज्यात आले आहेत. हिमाचलच्या खासदार कंगना रणौत यांनी नागपुरातील आर्वी विधानसभा मतदारसंघात सुमित वानखेडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटलं की, महाराष्ट्राने त्यांना ओळख दिली. त्यांनी महाविकास आघाडीला "महाअनाडी सरकार" म्हणत, धर्माचा विनाश आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप केला.