aaditya thackeray property details
1 / 30

आदित्य ठाकरेंचं निवडणूक प्रतिज्ञापत्र: २३ कोटींची मालमत्ता आणि एक दाखल गुन्हा!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. २४ ऑक्टोबरला शिवसेनेचे आदित्य ठाकरे, भाजपाचे राजन विचारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांसारख्या प्रमुख उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आदित्य ठाकरेंच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या मालमत्तेत पाच वर्षांत ६ कोटींची वाढ झाली असून, एकूण मालमत्ता २३ कोटी ४३ लाख आहे. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा एक गुन्हा नोंद आहे.

Swipe up for next shorts
Jahnavi Killekar Met Suraj Chavan see photos
2 / 30

जान्हवी किल्लेकरने सूरज चव्हाणची घेतली भेट, नेटकरी म्हणाले, “दिवस सगळ्यांचे बदलतात…”

बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक जान्हवी किल्लेकरने विजेता सूरज चव्हाणची त्याच्या गावी भेट घेतली. सूरजने या भेटीचे फोटो शेअर केले असून, जान्हवीने सुंदर साडी नेसली आहे. दोघांनी बिग बॉसच्या घरात ७० दिवस राहून ग्रँड फिनाले गाठले होते. जान्हवीने सहाव्या क्रमांकावर असताना ९ लाख रुपये घेऊन खेळ सोडला होता. सूरज लवकरच 'झापूक झुपूक' चित्रपटात झळकणार आहे.

Swipe up for next shorts
Check Your Oranges ad
3 / 30

‘तुमचे संत्री तपासा’, युवराज सिंहच्या NGO ची जाहिरात वादात

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या 'यू वी कॅन' या एनजीओने स्तनांच्या कर्करोगाबाबत जागृतीसाठी दिल्ली मेट्रोमध्ये एक जाहिरात प्रदर्शित केली होती. या जाहिरातीत स्तनांसाठी संत्री हा शब्द वापरल्यामुळे टीका होत आहे. सोशल मीडियावर आक्षेप घेतल्यानंतर दिल्ली मेट्रो प्रशासनाने जाहिरात हटवली. अनेकांनी ही जाहिरात लाजिरवाणी असल्याचे म्हटले.

Swipe up for next shorts
Dharmaveer 2 on OTT release
4 / 30

‘धर्मवीर २’ रिलीजच्या एका महिन्यातच OTTवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

प्रसाद ओक आणि क्षितीज दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'धर्मवीर २' आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे. २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ZEE5 वर उपलब्ध आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Devendra Fadnavis Mocks MVA Formula
5 / 30

“८५+८५+८५ म्हणजे २७० हे गणित..”; देवेंद्र फडणवीसांचा मविआला टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. महायुतीने १८२ आणि महाविकास आघाडीने १५८ जागा जाहीर केल्या आहेत. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली आणि माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी महाविकास आघाडीच्या गणिताची खिल्ली उडवली आणि महायुतीच्या २७८ जागांवर एकमत झाल्याचे सांगितले.

netizens reaction on Bigg Boss Marathi 5 Grand Finale
6 / 30

Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार, नेटकरी म्हणाले, “केवळ हिंदीसाठी झुकलात…”

बिग बॉस मराठी ५ हा शो मागील तीन महिन्यांपासून चर्चेत होता. रितेश देशमुखने होस्ट केलेल्या या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, परंतु १०० दिवसांच्या ऐवजी ८० दिवसांत संपवण्यात आल्याने प्रेक्षक नाराज होते. कलर्स मराठीने पुन्हा एकदा ग्रँड फिनाले दाखवण्याची घोषणा केली आहे. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स चर्चेत आहेत.

Bollywood Name History And What does this Real Meaning
7 / 30

हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलीवूड’ नाव कसं पडलं? याचा अर्थ काय आहे? जाणून घ्या…

FYI 12 hr ago

Bollywood Name History: बॉलीवूडच्या चित्रपटांचा जगभरात डंका आहे. बॉलीवूडच्या चित्रपटांना जगभरातील प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर उचलून घेत असतात. त्यामुळेच बॉलीवूडच्या चित्रपटांसह, गाणी, कलाकार, डायलॉगही सुपरहिट होत असतात. दरवर्षी बॉलीवूडचे चित्रपट जगभरात कोट्यावधींची कमाई करताना दिसतात. पण, बॉलीवूड शब्दाला ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन, सलमान खान, अनुराग कश्यप अशा अनेक कलाकारांचा विरोध आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड म्हणणं अपमानास्पद असल्याचं अनेक कलाकारांना वाटतं.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale on public demand
8 / 30

Bigg Boss Marathi 5 चा ग्रँड फिनाले पुन्हा रंगणार! कधी, कुठे पाहता येणार? वाचा…

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले पुन्हा एकदा रंगणार आहे. कलर्स मराठीने प्रोमो शेअर करून २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता फिनाले पुन्हा होणार असल्याची घोषणा केली आहे. या पर्वात रितेश देशमुखने होस्ट केलेल्या शोने टीआरपीचे रेकॉर्ड मोडले. ६ ऑक्टोबरला झालेल्या फिनालेत सूरज चव्हाण विजेता ठरला होता. आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच थरार अनुभवायला मिळणार आहे.

Who is Justice Sanjiv Khanna_ Justice Sanjiv Khanna Landmark judgments
9 / 30

भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांची निवड, ‘या’ तारखेला घेणार शपथ

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची भारताचे ५१ वे सरन्यायाधीश म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा केली. मावळते सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी खन्ना यांचे नाव सुचविले होते, ज्यावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले आहे.

Gunaratna Sadavarte is receiving calls from fans from all over the world to return to bigg boss 18 show says wife jayshree patil
10 / 30

गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’मध्ये पुन्हा जाण्यासाठी चाहत्याचे फोन; पत्नी म्हणाल्या…

हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर गेले आहेत. गुणरत्न सदावर्ते आणि हेमा शर्मा. १५ ऑक्टोबरला गुणरत्न सदावर्तेंना अचानक ‘बिग बॉस’च्या घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हेमा शर्मा एलिमिनेट झाली. पण, गुणरत्न सदावर्तेंच्या अचानक जाण्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसंच आता गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात पुन्हा जाण्यासाठी जगभरातून चाहते सतत फोन करत असल्याचा खुलासा त्यांची पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.

Bigg Boss 18 What is the real reason behind Gunaratna Sadavarte eviction from salman khan show
11 / 30

गुणरत्न सदावर्तेंना ‘बिग बॉस १८’मधून बाहेर काढण्याचं नेमकं कारण काय? स्वतः सांगत म्हणाले…

Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातून वकील गुणरत्न सदावर्ते अवघ्या आठ दिवसांत घराबाहेर झाले. घरात सर्वात एंटरटेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदावर्तेंना १५ ऑक्टोबरला अचानक शोबाहेर काढण्यात आलं. न्यायालयात प्रलंबित खटल्यामुळे काही काळासाठी घराबाहेर काढत असल्याचं ‘बिग बॉस’ने सांगितलं. पण नेमकं कारण काय होतं? याबाबत स्वतः गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं आहे.

Success Story of Dr. Prathap C. Reddy who goes to the office daily at 91 founder of Apollo Hospitals know his Net Worth
12 / 30

वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, ७१ रुग्णालये असलेल्या डॉ. रेड्डी यांचा प्रवास

Success Story of Dr. Prathap C. Reddy:  वयाच्या तब्बल ९१ व्या वर्षी, डॉ. प्रताप सी. रेड्डी दररोज कार्यालयात जातात, ७१ रुग्णालये आणि ५,००० पेक्षा जास्त फार्मसीसह अपोलो हॉस्पिटल्सची देखरेख करतात. आरोग्यसेवेबद्दलची त्यांची तळमळ आणि त्यांच्या कामातील समर्पण देशभरातील अनेकांना प्रेरणा देत आहे.

mumbai auto rickshaw meter fraud | mumbai traffic police awarness video
13 / 30

मुंबईत रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची ‘अशी’ होतेय फसवणूक; मुंबई पोलिसांनी शेअर केला धक्कादायक VIDEO

 मुंबईकरांनो, तुम्हीदेखील ऑटो रिक्षाने प्रवास करताय, मग ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. ऑटो रिक्षाने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना चालकांचा मुजोरीचा सामना करावा लागतो. रिक्षाने प्रवास करताना काहीवेळा असाही अनुभव येतो की, कापलेल्या अंतरापेक्षा मीटर अधिक वेगाने पळतेय. यावेळी आपली फसवणूक होतेय हे ग्राहकांच्या लक्षात आलेलं असतं, पण ते सिद्ध कसं करायचं हे समजत नाही. मात्र, आता मुंबई वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांकडून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्याकरता एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Bigg Boss 18 Why did Gunaratna Sadavarte decide to enter salman Khan show
14 / 30

“कलाकारांची राजकीय लफडी…”, गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचा सांगितला नेमका हेतू

१५ ऑक्टोबरच्या भागात ‘बिग बॉस’ने अचानक गुणरत्न सदावर्तेंना कन्फेशन रुममध्ये बोलवून काही वेळासाठी घराबाहेर जाण्यास सांगितलं. कारण न्यायालयात सदावर्तेसंबंधित काही खटले प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढणं आवश्यक होतं. पण, गुणरत्न सदावर्ते हे हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातील सर्वाधिक एंटरटेनर सदस्य होते. प्रेक्षकांसह सलमान खानने देखील त्यांचं कौतुक केलं होतं. अशातच गुणरत्न सदावर्तेंचा ‘बिग बॉस १८’मध्ये जाण्यामागचा नेमका हेतू काय होता? याचा खुलासा झाला आहे.

Who is Pakistani model Roma Michael
15 / 30

पाकिस्तानी मॉडेलचा बिकिनीवर रॅम्प वॉक; कठोर टीका झाल्यानंतर व्हिडीओ केला डिलीट

पाकिस्तानी मॉडेल रोमा मायकलला बिकिनी घालून रॅम्प वॉक केल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले. मिस ग्रँड इंटरनॅशनल २०२४ स्पर्धेत तिच्या व्हिडीओवर पाकिस्तानमधील काही गटांनी आक्षेप घेतल्याने तिला तो व्हिडीओ डिलीट करावा लागला. या घटनेमुळे पाकिस्तानच्या पुराणमतवादी विचारसरणीवर टीका होत आहे.

amitabh bachchan photo amid abhishek bachchan Aishwarya Rai divorce
16 / 30

“जेवढे प्रयत्न…”, अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ‘तो’ फोटो; कॅप्शनने वेधले लक्ष

महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे, ज्यात मेकअप आणि केस नीट करताना दिसत आहेत. या फोटोबरोबर त्यांनी "जेवढे प्रयत्न करायचे आहेत, तितके करा भावांनो, चेहऱ्याला आता काहीच होणार नाही," असं कॅप्शन दिलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

easy kandil making at home for diwali how to make akashkandil at home easy steps video diwali lantern
17 / 30

स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत

Kandil making at home: सगळ्यांचा आवडता दिवाळी सण जवळ आला आहे. त्यानिमित्ताने बाजारात लगबग, लोकांची गर्दी सुरू झाली आहे. नवनवे आकाशकंदील, दिवे, नवनवीन तोरणे, रांगोळी अशा अनेक वस्तू बाजारात आल्या आहेत. अशातच दिवाळीआधीच अव्वाच्या सव्वा भाव लावणारे दुकानदार या सगळ्या वस्तू महागच विकतात आणि म्हणूनच सगळ्यांच्याच खिशाला त्या परवडणाऱ्या नसतात.

Seema Sajdeh children did not visit her after divorce Sohail Khan
18 / 30

घटस्फोटानंतर सोहेल खानच्या घरीच राहतात दोन्ही मुलं, आईकडे जाणं टाळतात, कारण…

सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा सजदेह तिचा मुलगा योहानला घेऊन वरळीला राहायला गेली. तिच्या या निर्णयावर तिची मैत्रीण महीप कपूर नाराज होती. 'फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्ह्ज'मध्ये सीमाने या निर्णयाबद्दल खेद व्यक्त केला. तिचा मोठा मुलगा निर्वाणनेही या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. सीमाने सांगितले की, वरळीला जाण्याचा निर्णय योहानसाठी चांगला वाटला, पण अपेक्षेप्रमाणे काहीच घडलं नाही.

Bigg Boss 18 chahat pandey throw water on avinash Mishra and between fight
19 / 30

सलमान खानला लग्नाची मागणी घालणाऱ्या चाहत पांडेने अविनाश मिश्रावर फेकलं पाणी अन् मग….

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात गेल्या आठवड्यापासून रेशनवरून होणारा वाद अधिक वाढला आहे. कारण आहे अविनाश मिश्रा. अविनाशला जेलमध्ये गेल्यापासून रेशन वाटपाचा अधिकार देण्यात आला आहे. २३ ऑक्टोबरच्या भागात त्याने थेट जाहीर केलं की, तो त्याच्या फेवरेट सदस्यांनाच अधिकच रेशन देणार. अशातच या रेशनवरून चाहत पांडेने एक पाऊल उचललं. ते म्हणजे तिने पहाटे ५ वाजता उठून झोपलेल्या अविनाश मिश्रावर पाणीचं फेकलं; ज्यामुळे अविनाश खूप भडकला. त्यानंतर अविनाश आणि चाहतमध्ये टोकाचे वाद झाल्याचं पाहायला मिळालं.

Suvrat Joshi announced Savlat Majhi Ladki Yojana for drama lovers
20 / 30

Video: सुव्रत जोशीने आणली ‘सवलत माझी लाडकी योजना’, नेमकी काय आहे? जाणून घ्या…

अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले यांची प्रमुख भूमिका असलेलं ‘वरवरचे वधू-वर’ नाटक सध्या रंगभूमीवर चांगलंच गाजत आहे. अभिनेता विराजस कुलकर्णीने हे नाटक लिहिलं असून दिग्दर्शनही केलं आहे. या नाटकात सुव्रत आणि सखीसह अभिनेता सूरज पारसनीसदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. म्हणूनच सुव्रत जोशीने ‘सवलत माझी लाडकी योजना’ प्रेक्षकांसाठी खास आणली आहे. ही योजना नेमकी काय आहे? जाणून घ्या…

Dimple Kapadia refused to post with daughter Twinkle Khanna
21 / 30

Video: डिंपल कपाडिया लेक ट्विंकल खन्नाचा ‘ज्युनिअर’ असा उल्लेख करत म्हणाल्या…

ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात त्या मुलगी ट्विंकल खन्नाबरोबर फोटोसाठी पोज देण्यास नकार देतात. मुंबईतील 'गो नोनी गो' चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान हा प्रसंग घडला. डिंपल यांनी ट्विंकलला ज्युनिअर म्हटले आणि फक्त सिनिअर्सबरोबर पोज देण्याचे सांगितले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'गो नोनी गो' हा ट्विंकल खन्ना निर्मित चित्रपट आहे, ज्यात डिंपल मुख्य भूमिकेत आहेत.

Marathi actress Khushboo Tawde Baby Girl Naming Ceremony Video viral
22 / 30

खुशबू तावडेच्या लेकीचा नामकरण सोहळा घरीच साध्या पद्धतीने पडला पार, पाहा व्हिडीओ

Khushboo Tawde Baby Girl Naming Ceremony : अभिनेत्री खुशबू तावडे २ ऑक्टोबरला दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी तिने आपल्या मुलीबरोबरचे फोटो शेअर करून नाव जाहीर केलं. ‘राही’ असं खुशबूच्या लेकीचं नाव आहे. नुकताच लेकीचा नामकरण सोहळा घरच्या घरीच साध्या पद्धतीने पार पडला. याचा व्हिडीओ खुशबूची बहीण, अभिनेत्री तितीक्षा तावडेने ( Titeekshaa Tawde ) शेअर केला आहे.

abhijeet bichukale will contest assembly election from satara
23 / 30

अभिजीत बिचुकले शिवेंद्रराजेंविरोधात लढवणार निवडणूक; म्हणाले, “हे दोन्ही राजे फक्त…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २०२४: विधानसभा निवडणुकांना काही दिवस उरले आहेत आणि राजकीय पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत बिचुकले सातारा-जावली मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसलेंविरोधात निवडणूक लढवणार आहेत. बिचुकले म्हणाले की, ते कोणत्याही पक्षाच्या मागे फिरत नाहीत आणि साताऱ्याच्या विकासासाठी काम करतील. दोन्ही राजे सोईचं राजकारण करतात.

vijay wadettiwar on mva seat sharing
24 / 30

मविआमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ? विजय वडेट्टीवारांच्या ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपावर चर्चा सुरू असताना, मविआने प्रत्येकी ८५ जागांचा निर्णय घेतला आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस जास्त जागा लढवणार असल्याचे सांगितल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेसची पहिली यादी लवकरच येणार असून, १५ जागांची अदलाबदली होणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर महाविकास आघाडी घेईल.

mva seat sharing formula
25 / 30

मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांनी जागावाटप व उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीने २७३ जागांचे गणित जाहीर केले, परंतु उरलेल्या १५ जागांबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, या जागा मित्रपक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत आणि काँग्रेसच्या जागा १०० ते १०५ दरम्यान असतील.

krushna abhishek govinda feud ended
26 / 30

७ वर्षांनी वाद संपला! कृष्णा अभिषेकने घेतली जखमी मामाची भेट; म्हणाला, “मी मामीला…”

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील सात वर्षांचे मतभेद संपले आहेत. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर कृष्णा ऑस्ट्रेलियातून परतला आणि मामाची भेट घेतली. कृष्णाने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी एक तास एकत्र घालवला आणि जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. आता दोघांमधील सर्व मतभेद दूर झाले आहेत.

priyanka gandhi assets
27 / 30

आठ लाखांची होंडा सीआरव्ही अन् सोनं-चांदी; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?

प्रियांका गांधी वाड्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण १२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी ४.२४ कोटी जंगम, तर ७.७४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Kedar Dighe and Eknath Shinde
28 / 30

कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे. एकनाथ शिंदेंना येथे टफ फाईट मिळणार आहे. या मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे मतदारवर्ग विभागला आहे.

Mahavikas aghadi Seat Sharing Formula
29 / 30

मविआचा जागा वाटप झालं! काँग्रेस, ठाकरे अन् पवारांचा सेफ गेम; २८८ जागांचा फॉर्म्युला काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे जागा वाटप रखडले होते. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर वाद होता. अखेर, महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ८५ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा इतर मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.

Uddhav thackeray
30 / 30

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा हुकमी एक्का!

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर कोणाला संधी मिळणार हा प्रश्न होता. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का उभा केला आहे. कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.