महाराष्ट्र निवडणुकीत तुम्हीही मतदानासाठी पात्र आहात? मग ‘हे’ तीन अॅप असलेच पाहिजेत!
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मतदारांसाठी VHA, cVigil आणि KYC या तीन मोबाईल अॅप्सची माहिती दिली. VHA अॅपद्वारे मतदार नोंदणी, cVigil अॅपद्वारे गैरप्रकारांची माहिती आणि KYC अॅपद्वारे उमेदवारांची माहिती मिळेल. उमेदवारांसाठी सुविधा पोर्टल उपलब्ध आहे.