राज्यात किती वाजेपर्यंत करता येणार मतदान? वेळ निघून जाण्याआधी लगेच मतदान केंद्रावर जा!
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान झाले. नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्यात येत आहे. मतदान केंद्रांवर दुपारनंतर गर्दी वाढली असून, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. ९.७ कोटी मतदार ४१३६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.