राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार!
महाराष्ट्रात जागावाटपात जरी काँग्रेसनं शंभरीपार मजल मारली असली, तरी त्यातल्या जवळपास ७७ जागांवर काँग्रेस भाजपाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचवेळी समोरच्या बाजूनेही काँग्रेसशी थेट लढतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची असली, तरी २८८ पैकी तब्बल ७७ जागांवर दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.