Maharashtra assembly election 2024 MNS releases Seventh list of 18 candidates
1 / 30

मनसेची सातवी यादी जाहीर, आतापर्यंत १२८ जणांना उमेदवारी; सर्व शिलेदारांची नावे एका क्लिकवर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात १८ जणांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत मनसेने १२८ उमेदवारांची घोषणा केली आहे, ज्यात अनेक हायवोल्टेज मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी विधानसभा २०२४ निवडणुकांमध्ये मनसे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Swipe up for next shorts
Maharashtra assembly election 2024 Ajit Pawar NCP releases fourth list of 2 candidates
2 / 30

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने चौथी यादी जाहीर केली आहे, ज्यात दोन उमेदवारांची नावे आहेत. आतापर्यंत अजित पवारांनी ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने १४६ आणि शिंदे गटाने ८० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अजित पवारांनी महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Swipe up for next shorts
Eknath Shinde Family
3 / 30

शिंदे सासू-सुना मुख्यमंत्र्यांच्या विजयासाठी कंबर कसून मैदानात!

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ ऑक्टोबर रोजी ठाण्यात शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे प्रचाराला हजर होत्या. लता शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन केलं. वृषाली शिंदे यांनी सासू-सून नात्याऐवजी माय-लेकीसारखं नातं असल्याचं सांगितलं.

Swipe up for next shorts
Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
4 / 30

“दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा”, अजित पवारांच्या बारामती सभेत सूरज चव्हाणचं भाषण

बारामती मतदारसंघातून आज ( २८ ऑक्टोबर ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी कण्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने खास उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर त्याने भाषण करत अजित पवारांना मतं देण्यासाठी जनतेला आवाहन केलं.

Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
5 / 30

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकींचा खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी बिश्नोई गँगने हत्या केली. त्यांच्या हत्येचा सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. सिद्दिकी आणि सलमान खान सख्ख्या भावांसारखे होते. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या खुनानंतर सलमान खान झोपू शकत नाहीये, असं झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं.

Prasad Oak was on a liquid diet for 55 days for the film Dharmaveer
6 / 30

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…

सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक प्रसाद ओक आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रसाद ओक लागोपाठ सुपरहिट चित्रपट देत आहे. अभिनयाबरोबर आपल्या दिग्दर्शनानेही प्रसादने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याने ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी ५०हून अधिक दिवसांसाठी लिक्वीड डाएट केलं होतं. याचा किस्सा अलीकडेच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितला.

Nimrat Kaur Break Silence On Abhishek Bachchan Dating Rumors
7 / 30

“मी काहीही केलं तरी…”, अभिषेक बच्चनला डेट करण्याच्या चर्चांबाबत निम्रत कौरचे वक्तव्य

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेकचं नाव निम्रत कौरशी जोडलं जात आहे. निम्रतने या अफवांवर प्रतिक्रिया देत, गॉसिप्स थांबत नाहीत, असं म्हटलं. 'दसवीं' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच्या व्हिडीओमुळे अफवा पसरल्या. अनंत अंबानीच्या लग्नात वेगळं येण्यामुळे चर्चांना उधाण आलं.

Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
8 / 30

“मी ब्राम्हण असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दलच्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. ६ ऑक्टोबरला सूरज चव्हाणला विजेता घोषित करताच अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील सूरजबद्दल पोस्ट लिहून कौतुक केलं होतं. पण या पोस्टवरून अभिजीतला ट्रोल करण्यात आलं. त्याच ट्रोलिंगवर आता अभिजीतने भाष्य केलं आहे.

sujay vikhe patil controversial Statement
9 / 30

“आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

भाजपाने आतापर्यंत १२१ जागांची यादी जाहीर केली असून संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूरमधील जागा जाहीर व्हायच्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखे असा वाद सुरू आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जहाल भाषणात आचारसंहिता मोडण्याची भाषा केली. जयश्री थोरात आणि सुजय विखे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असून समर्थकांमध्येही तणाव आहे. सुजय विखे यांनी विरोधकांना धमकी दिली की, "टायगर अभी जिंदा है."

Vasubaras 2024 Easy rangoli for vasubaras easy cow rangoli for Diwali rangoli video
10 / 30

आकर्षक रांगोळी काढून साजरी करा वसुबारस; सोप्या पद्धतीने काढा गोमुख आणि वासरू, पाहा VIDEO

आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. आज २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. गाईची सेवा केली जाते. गाईला आईचं स्थान दिलं जातं. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून, म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. आज वसुबारस या खास दिनानिमित्त आपण सोप्या पद्धतीनं आकर्षक रांगोळी कशी काढावी ते जाणून घेणार आहोत.

Bollywood Actress Shilpa Shetty Dance On Taambdi Chaamdi song
11 / 30

शिल्पा शेट्टीला ‘तांबडी चामडी’ गाण्याची पडली भुरळ, अभिनेत्रीने केला हटके डान्स

महाराष्ट्राच नव्हे तर जगभरात सध्या एका मराठी गाण्याचा डंका आहे ते म्हणजे ‘तांबडी चामडी’. सोशल मीडियावर या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. श्रेयस सागवेकरने लिहिलेलं आणि कृणाल घोरपडेने संगीतबद्ध केलेलं ‘तांबडी चामडी’ गाण्याने बरेच रेकॉर्ड मोडले आहेत. अशा या रेकॉर्ड ब्रेक गाण्याची भुरळ बॉलीवूड सेलिब्रिटींनाही पडली आहे. नुकतीच शिल्पा शेट्टी ‘तांबडी चामडी’ गाण्यावर हटके डान्स करताना पाहायला मिळाली.

shahrukh khan dance with mother in law
12 / 30

Video: शाहरुख खानचा सासूबाईंबरोबर डान्स; दुबईतील व्हिडीओ होतोय व्हायरल

सुपरस्टार शाहरुख खानचा दुबईतील एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात शाहरुखने जबरदस्त डान्स केला, ज्यात तो सासू सविता छिब्बरबरोबर नाचताना दिसतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. दुसऱ्या व्हिडीओत शाहरुख 'पठाण' चित्रपटातील 'झूम जो पठाण' गाण्यावर डान्स करताना दिसतो. हा कार्यक्रम त्याचा मुलगा आर्यन खानने आयोजित केला होता. शाहरुख खान लवकरच 'किंग' चित्रपटात दिसणार आहे.

Sada Sarvankar
13 / 30

Sada Sarvankar : सदा सरवणकर निवडणुकीवर ठाम; सोशल मीडियावरील पोस्टने वेधलं लक्ष!

माहिम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सदा सरवणकर, मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाला राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे सदा सरवणकर यांचा अर्ज मागे घेण्याची मागणी झाली होती. परंतु, सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम असून २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार आहेत.

amit thackeray mahim assembly constituency
14 / 30

अमित ठाकरेंना वाटते ‘या’ गोष्टीची धाकधूक; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी माध्यमांना म्हणाले…

माहीम व वरळी विधानसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे घराण्याची तिसरी पिढी, अमित ठाकरे व आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरेंनी माहीम मतदारसंघातून अर्ज दाखल केला व आदित्य ठाकरेंवर टीका केली. त्यांनी मतदारसंघात पायी फिरण्याची आवड व्यक्त केली. विद्यमान आमदार सदा सरवणकर अर्ज मागे घेणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. निवडणूक जिंकल्यास समुद्रकिनाऱ्याला प्राधान्य देण्याचे अमित ठाकरेंनी सांगितले.

Neelam Kothari admits she wanted to kill Chunky Panday
15 / 30

“त्याचा जीव घ्यावा वाटत होता”, शूटिंगदरम्यान चंकी पांडेच्या ‘त्या’ कृतीवर भडकलेली नीलम

१९८७ मध्ये रिलीज झालेल्या 'आग ही आग' चित्रपटात चंकी पांडे, धर्मेंद्र, गुलशन ग्रोवर आणि नीलम कोठारी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. नीलमने या चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला आहे. चंकी पांडेमुळे तिचा पाय भाजला होता आणि ती प्रचंड चिडली होती. चंकी तिचा चांगला मित्र असूनही, त्याच्या कृतीमुळे तिला त्याचा जीव घ्यावासा वाटत होता, असा खुलासा तिने केला.

Bigg Boss gave these big power to Chahat Pandey
16 / 30

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला दिली मोठी पॉवर, नेटकरी म्हणाले, “आता येणार मज्जा…”

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये रेशनवरून जबरदस्त वाद पाहायला मिळाले. अविनाश मिश्राने रेशन वाटप नीट न केल्यामुळे घरात सातत्याने वाद होतं होते. ज्यावरून सलमान खानने वीकेंड वारला अविनाशला चांगलंच सुनावलं. पण चौथ्या आठवड्यात रेशनवरील वाद कमी होतील अशी शक्यता आहे. कारण आता जेलमध्ये सारा खान आणि तजिंदर बग्गा आहेत. त्यामुळे घरातील सदस्यांना सारा आणि तजिंदर रेशनचं व्यवस्थित वाटप करतील, असा विश्वास आहे. अशातच आता चाहत पांडेला ‘बिग बॉस’ने एक मोठी पॉवर दिली आहे.

What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
17 / 30

भाऊबीजेला अजित पवारांची वाट बघणार का? सुप्रिया सुळेंचं उत्तर, “प्रेम असतं तेव्हा…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत रंगणार आहे. युगेंद्र पवार यांनी महाविकास आघाडीच्या तिकिटावर अर्ज दाखल केला आहे. सुप्रिया सुळे यांनी युगेंद्र पवारांसोबत अर्ज दाखल करताना बारामतीकरांशी प्रेम आणि विश्वासाचं नातं असल्याचं सांगितलं. अजित पवारांची भाऊबीजेला वाट पाहणार का? हे विचाराल्यावरही सुप्रिया सुळेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

Sharad Pawar and Yugendra Pawar
18 / 30

युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक प्रतिक्रिया!

महाविकास आघाडीने बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली आहे, ज्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात काका-पुतण्या लढत पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार यांनी बारामती तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला, ज्यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. शरद पवारांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तयारीबद्दल माहिती दिली आणि नव्या पिढीच्या उमेदवारांना जनतेशी बांधिलकी ठेवण्याचा सल्ला दिला.

Mirzapur The Film announced watch Kaleen bhaiya guddu pandit and munna Tripathi teaser
19 / 30

Video: ओटीटीनंतर मोठ्या पडदा गाजवणार ‘मिर्झापूर’ चित्रपट, लवकरच होणार प्रदर्शित

ओटीटीच्या दुनियेत बहुचर्चित आणि लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या वेब सीरिज पैकी एक म्हणजे 'मिर्झापूर'. या वेब सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले. या तिन्ही सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. गुड्डू पंडीत आणि कालीन भैय्याच्या मिर्झापूरच्या दुनियेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यामुळे या यशानंतर अ‍ॅमेझॉन एमजीए स्टुडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रोडक्शनने एक मोठी घोषणा नुकतीच केली आहे. ओटीटीनंतर आता 'मिर्झापूर' मोठा पडदा गाजवणार आहे. म्हणजेच लवकरच 'मिर्झापूर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

amit thackeray vs aadityathackeray maharashtra assembly election
20 / 30

‘राजपुत्रा’ची ‘उद्धवपुत्रा’वर थेट टीका; अमित ठाकरे म्हणाले, “तुम्ही लोकप्रतिनिधी असाल…”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील ३६ मतदारसंघांपैकी अमित ठाकरे विरुद्ध आदित्य ठाकरे ही लढत चर्चेत आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून तर आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर वरळीतील विकासकामांवरून टीका केली आहे. तसेच, गेल्या १० वर्षांत पर्यावरण खात्याचं शून्य काम झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

south star was first Indian to charge 1 crore per film
21 / 30

‘हा’ आहे एक कोटी मानधन घेणारा पहिला भारतीय अभिनेता

९० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत एक कोटी रुपये मानधन घेणारे पहिले अभिनेता चिरंजीवी होते. त्यांनी १९९२ मध्ये 'आपडबंधवुडू' सिनेमासाठी १.२५ कोटी रुपये घेतले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान यांच्यापैकी कुणीही इतकं मानधन घेतलं नव्हतं. चिरंजीवी यांनी तेलुगू सिनेसृष्टीत अनेक हिट चित्रपट दिले आणि आता ते एका सिनेमासाठी ४० कोटी रुपये मानधन घेतात.

Sanjay Raut and Nana Patole
22 / 30

मविआतील जागा वाटपात ‘टायपिंग मिस्टेक’, संजय राऊत-नाना पटोले यांच्यात पुन्हा खडाजंगी!

महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केल्यावर दक्षिण सोलापूरमध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेने अमर पाटील यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने दिलीप माने यांचे नाव जाहीर केले. संजय राऊतांनी याला टायपिंग मिस्टेक म्हटले, तर नाना पटोले यांनी राऊतांना विरोधकांविरुद्ध लढण्याचा सल्ला दिला.

Bigg Boss 18 salman khan and ajay devgn discussed a past eye injury from action scene in singham again |
23 / 30

‘सिंघम अगेनच्या’मधील एका अ‍ॅक्शन सीनमुळे अजय देवगणला २-३ महिने…, सलमान खान म्हणाला…

Bigg Boss 18: हिंदी 'बिग बॉस'च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. नुकताच वीकेंड वार पार पडला. या वीकेंड वारमध्ये सलमान खानने अविनाश मिश्राची चांगलीच कानउघडणी केली. त्याबरोबरचं करणवीर मेहरादेखील सुनावलं. रविवारी वीकेंड वारला आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'चं प्रमोशन करण्यासाठी अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शन रोहित शेट्टीने उपस्थिती लावली होती. यावेळी 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणबरोबर झालेली एक घटना सलमान खानने सांगितली.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
24 / 30

“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?

माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे यांनी माहीममध्ये बदलाची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये असे मत व्यक्त केले. २०१७ मध्ये शिवसेनेने सहा नगरसेवक फोडल्यामुळे त्यांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद नाही असंही म्हणाले. अमित ठाकरे यांनी आत्मविश्वासाने निवडणूक जिंकण्याची खात्री व्यक्त केली.

Kajol reveals weirdest rumour about her
25 / 30

काजोल प्रवास करत असलेलं विमान क्रॅश झालंय; तिच्या आईला कोणीतरी फोन करून सांगितलं अन्…

बॉलीवूड अभिनेत्री काजोलने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये तिच्या मृत्यूच्या अफवांबद्दल एक किस्सा सांगितला. तिने सांगितले की, सोशल मीडियाच्या आधी तिच्या आईला तिच्या विमान क्रॅश झाल्याची खोटी बातमी कळली होती. सोशल मीडियावरही तिच्या निधनाच्या खोट्या बातम्या पसरल्या होत्या. काजोल सध्या 'दो पत्ती' चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यात तिने पोलिसाची भूमिका केली आहे.

who is fahad ahmad swara bhaskar husband
26 / 30

स्वरा भास्करच्या पतीच्या उमेदवारीवरून शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक! कोण आहेत..

बॉलिवुड अभिनेत्री स्वरा भास्करच्या पती फहाद अहमद यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने अणुशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. फहाद अहमद हे समाजवादी पक्षातून राष्ट्रवादीत आले असून, त्यांची थेट लढत नवाब मलिक यांच्या मुलगी सना मलिक यांच्याशी होणार आहे. कार्यकर्त्यांनी 'आमच्या कुणाचीच पत्नी अभिनेत्री नसल्यामुळे आम्हाला उमेदवारीत टाळलं' अशी नाराजी व्यक्त केली आहे.

Vanchit Bahujan Aghadi
27 / 30

वंचितची आठवी यादी जाहीर; आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंविरोधात उमेदवार रिंगणात!

उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस उरलेले असल्याने सर्वच पक्षांकडून जागा वाटप जलद गतीने सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील वाद संपत नसल्याने त्यांचं जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढणार असल्याने त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेने सहावी यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने आठवी यादी जाहीर केली आहे.

Sujay Vikhe Patil Emotional Speeh
28 / 30

“सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय!” भरसभेत सुजय विखेंना अश्रू अनावर

संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील आणि जयश्री थोरात यांच्यात वाद विकोपाला पोहोचले आहेत. जयश्री थोरात यांच्यावर झालेल्या अन्यायावर न्याय मागताना सुजय विखे पाटील यांनी आदिवासी महिलांनाही न्याय मिळावा अशी मागणी केली. भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना आवाहन केले की, छोट्या आमिषांसाठी मुलांच्या भवितव्याशी तडजोड करू नका. सुजय विखे संपल्यास गोर-गरीबांचा आवाज आणि विकास संपेल, असेही त्यांनी सांगितले.

Surbhi Jyoti Sumit Suri got married
29 / 30

‘कबूल है’ फेम अभिनेत्रीने बॉयफ्रेंड निसर्गाच्या सानिध्यात बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

'नागिन' फेम टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीने तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीशी रविवारी (२७ ऑक्टोबर) उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील रिसॉर्टमध्ये साधेपणाने लग्न केलं. दोघेही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. सुरभीने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरभीने 'कबूल है', 'नागिन' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Congress Candidates List
30 / 30

Congress Candidates List : काँग्रेसच्या नव्या यादीतून १४ उमेदवारांना संधी, अंधेरी पश्चिममधून उमेदवार जाहीर!

मविआतील जागावाटपाचा घोळ अद्यापही संपलेला नाही. नाना पटोले यांनी ८५-८५-८५ चा फॉर्म्युला जाहीर केला होता, तर बाळासाहेब थोरातांनी ९०-९०-९० चा फॉर्म्युला मांडला. मात्र, काँग्रेसने आतापर्यंत १०१ उमेदवार घोषित केले आहेत, ज्यामुळे समसमान फॉर्म्युल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येत असल्याने काँग्रेसने १४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.