मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध; मूलभूत गरजांपासून मराठी अस्मितेच्या मुद्द्यांना घातला हात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला आहे. 'आम्ही हे करू' या नावाने जाहीरनाम्याची पुस्तिका प्रसिद्ध केली असून, 'आम्ही हे केलं' या पुस्तिकेतून त्यांच्या कामांचा आढावा घेतला आहे. जाहीरनामा चार भागात विभागला असून, मुलभूत गरजा, दळणवळण, औद्योगिक धोरण आणि मराठी अस्मिता यांचा समावेश आहे.