vijay wadettiwar on mva seat sharing
1 / 30

मविआमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ? विजय वडेट्टीवारांच्या ‘या’ विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. जागावाटपावर चर्चा सुरू असताना, मविआने प्रत्येकी ८५ जागांचा निर्णय घेतला आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस जास्त जागा लढवणार असल्याचे सांगितल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काँग्रेसची पहिली यादी लवकरच येणार असून, १५ जागांची अदलाबदली होणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर महाविकास आघाडी घेईल.

Swipe up for next shorts
mva seat sharing formula
2 / 30

मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांनी जागावाटप व उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीने २७३ जागांचे गणित जाहीर केले, परंतु उरलेल्या १५ जागांबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, या जागा मित्रपक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत आणि काँग्रेसच्या जागा १०० ते १०५ दरम्यान असतील.

Swipe up for next shorts
krushna abhishek govinda feud ended
3 / 30

७ वर्षांनी वाद संपला! कृष्णा अभिषेकने घेतली जखमी मामाची भेट; म्हणाला, “मी मामीला…”

लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कॉमेडियन कृष्णा अभिषेक यांच्यातील सात वर्षांचे मतभेद संपले आहेत. गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर कृष्णा ऑस्ट्रेलियातून परतला आणि मामाची भेट घेतली. कृष्णाने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी एक तास एकत्र घालवला आणि जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. आता दोघांमधील सर्व मतभेद दूर झाले आहेत.

Swipe up for next shorts
priyanka gandhi assets
4 / 30

आठ लाखांची होंडा सीआरव्ही अन् सोनं-चांदी; प्रियांका गांधी वाड्रा यांची एकूण संपत्ती किती?

प्रियांका गांधी वाड्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात त्यांनी त्यांच्या एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे एकूण १२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यापैकी ४.२४ कोटी जंगम, तर ७.७४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Kedar Dighe and Eknath Shinde
5 / 30

कोपरी-पाचपाखाडीत शिष्य विरुद्ध वारसदार युद्ध; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघे रिंगणात!

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे सेना विरुद्ध सेना असा सामना रंगणार आहे. एकनाथ शिंदेंना येथे टफ फाईट मिळणार आहे. या मतदारसंघात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे मतदारवर्ग विभागला आहे.

Mahavikas aghadi Seat Sharing Formula
6 / 30

मविआचा जागा वाटप झालं! काँग्रेस, ठाकरे अन् पवारांचा सेफ गेम; २८८ जागांचा फॉर्म्युला काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीचे जागा वाटप रखडले होते. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुंबई आणि विदर्भातील काही जागांवर वाद होता. अखेर, महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी ८५ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित जागा इतर मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत.

Uddhav thackeray
7 / 30

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात ठाकरेंचा हुकमी एक्का!

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर कोणाला संधी मिळणार हा प्रश्न होता. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का उभा केला आहे. कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Supreme court on Delhi Air Pollution
8 / 30

“पर्यावरण संरक्षण कायदा दंतहीन”, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे!

दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्राला १० दिवसांची मुदत दिली आहे. पंजाब सरकारलाही कारवाई न केल्याबद्दल फटकारले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असून, पुढील दोन दिवसांत प्रदूषण पाच पटीने वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने कठोर आदेश जारी करण्याचा इशारा दिला आहे.

Painkillers side effects advantage disadvantage overusing painkillers harming your stomach and kidney
9 / 30

डोकेदुखी, पोटदुखी झाली की लगेच पेनकिलर घेताय? अतिवापरामुळे होऊ शकतो आरोग्याला धोका

पेनकिलर्स जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी औषधे आहेत. यामध्ये ओव्हर-द-काउंटर पर्यायांपासून ते प्रिस्क्रिप्शन औषधांपर्यंतचा समावेश आहे आणि या औषधांनी डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या वेदनांसारख्या विविध समस्यांवर त्वरित आराम मिळतो. परंतु, पेनकिलर्सच्या अतिवापरामुळे किंवा अयोग्य वापरामुळे आरोग्याच्या महत्त्वपूर्ण समस्या उद्भवू शकतात, विशेषत: पोट आणि किडनीसंबंधित गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात.

Devendra Fadnavis on Assembly Election 2024
10 / 30

भाजपाने मुंबईतील पहिली बंडखोरी रोखली; पक्षातील नाराजी नाट्यावर अखेर पडदा!

भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर काही इच्छूक उमेदवार नाराज झाले होते. कुलाबा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राहुल नार्वेकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने माजी मंत्री राज पुरोहित नाराज होते. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी राज पुरोहितांची नाराजी दूर केली. राहुल नार्वेकर आणि राज पुरोहित यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन एकत्र काम करण्याचे आश्वासन दिले. २०२४ च्या निवडणुकीत कुलाब्यातील राजकीय समीकरणे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Salman Khan Old Viral Video
11 / 30

“काळवीटची शिकार मी केलीच नाही”, सलमान खानचा जुना VIDEO पुन्हा चर्चेत!

सलमान खानवर १९९९ पासून काळविट शिकार प्रकरणाचा आरोप आहे. "हम साथ साथ है" चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडला होता. २००८ साली एका मुलाखतीत सलमानने शिकार न केल्याचा दावा केला होता. सध्या लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. सलमानला ५ कोटींची खंडणी मागण्यात आली असून, न दिल्यास गंभीर परिणाम होण्याची धमकी देण्यात आली आहे.

Bigg Boss marathi season 5 winner suraj Chavan share first reel video
12 / 30

‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणने केला पहिला Reel व्हिडीओ

सूरज चव्हाणने बहुमताने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. हे पर्व संपून १९ दिवस उलटले आहेत. पण तरीही अजून या पर्वातील सदस्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सूरजने पहिला रील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Sooji vs Wheat Flour : Benefits of Rava and Wheat Flour
13 / 30

रवा की गव्हाचे पीठ; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

रवा आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे का की गव्हाचे पीठ, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल येथील इंटरनल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. राकेश गुप्ता यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली आणि रवा आणि गव्हाच्या पिठाचे फायदे आणि तोटे समजून घेतले.

iit delhi student suicide news marathi
14 / 30

IIT विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, आत्महत्येचा संशय; हत्येची शक्यता पोलिसांनी फेटाळली

फेब्रुवारीत एमटेकच्या विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर, आता आयआयटी दिल्लीच्या हॉस्टेलमध्ये पदव्युत्तर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला असून हत्या फेटाळली आहे. विद्यार्थ्याने मानसिक तणावासाठी उपचार घेतले होते. आयआयटी दिल्लीचे डीन बी. के. पाणीग्रही यांनी विद्यार्थ्यांना तणाव जाणवल्यास समुपदेशन केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

Woman poisons boyfriend thinking he would inherit ₹252 crore.
15 / 30

२५२ कोटींसाठी बॉयफ्रेंडवर विषप्रयोग, हत्या झाल्यानंतर गर्लफ्रेंडवर पश्चातापाची वेळ

अमेरिकेतील नॉर्थ डकोटा येथे पैशांच्या हव्यासाने इना थिया केनेअर (४८) हिने आपल्या बॉयफ्रेंड स्टिव्ह रिले (५१) यांची विष देऊन हत्या केली. तिला वाटले होते की, रिलेच्या मृत्यूनंतर २५२ कोटी रुपये तिच्या नावावर होतील, परंतु हे वृत्त खोटे निघाले. रिलेच्या मित्रांनी साक्ष दिल्याने इनाला २५ वर्षांची शिक्षा आणि २.९ लाखांचा दंड ठोठावला आहे.

lawrence bishnoi marathi news
16 / 30

सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं सुटकेसाठी थेट लॉरेन्स बिश्नोईचं घेतलं नाव; पोलीस चक्रावले!

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई चर्चेत आला आहे. बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. कानपूरमध्ये राजीव कुमारने सासरच्या जाचाला कंटाळून बिश्नोई गँगकडून धमक्या येत असल्याची खोटी तक्रार केली. तपासाअंती पोलिसांना सत्य समजले. सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी राजीवला समज दिली व अहवाल मागवला.

Marathi actress Rupali Bhosale and Kushal Badrike had a meeting accidentally
17 / 30

रुपाली भोसले आणि कुशल बद्रिकेची अचानक झाली भेट, अभिनेत्री म्हणाली, “या मुलात जरा सुद्धा…”

'आई कुठे काय करते' मालिकेतून संजना म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली भोसले नेहमी चर्चेत असते. रुपाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कामाबरोबर वैयक्तिक आयुष्याबाबत रुपाली पोस्ट करत असते. नुकतीच तिने कुशल बद्रिकेसंदर्भात पोस्ट केली आहे. तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Aditya Thackeray and Raj Thackeray
18 / 30

अर्धा समुद्र भावाच्या मतदारसंघात, स्वच्छ करणार का? प्रश्नावर अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, राज ठाकरे यांनी त्यांच्या सुपुत्र अमित ठाकरे यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे यांनी समुद्र किनाऱ्यांच्या अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि निवडून आल्यास माहिमच्या पर्यावरणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी विविध मोहिमा राबवल्या आहेत.

sanjay raut on dadar mahim amit thackeray
19 / 30

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”

दादर-माहीम हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे. अशावेळी उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरच आता शिवसेनेचे ( उद्धव ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना जर दादर-माहीममधून ठाकरे परिवारातील अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील, तर तरुणांचा राजकारणात स्वागत करावं, ही आमची परंपरा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

New Zealand batter Chad Bowes World Record Smashes fastest List A double hundred in 103 balls
20 / 30

नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक

न्यूझीलंडचा फलंदाज चॅड बोवेसने फोर्ड कप स्पर्धेत सर्वात जलद द्विशतक झळकावून नवा जागतिक विक्रम केला आहे. कँटरबरी किंग्जसाठी खेळताना, बोवेसने ओटागो व्होल्ट्सविरुद्ध १०३ चेंडूत २७ चौकार आणि सात षटकारांसह २०५ धावा केल्या. बोवेसने ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि भारतीय एन जगदीसन यांचा ११४ चेंडूंत द्विशतक करण्याचा विक्रम मोडला. बोवेसने ५३ चेंडूत शतकही झळकावले.

Bigg Boss 18 arfeen khan sent to jail and sara khan evicted from salman khan show
21 / 30

हृतिकच्या लाइफ कोच कपलला ‘ही’ चूक पडली महागात, एक जेलमध्ये तर दुसऱ्याला केलं बेघर!

‘बिग बॉग १८’च्या घरात गेल्या आठवड्यात रेशनवरून घरात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘बिग बॉस’ने थेट रेशनच्या ऐवजी दोन सदस्यांना जेलमध्ये टाकण्याचा किंवा थेट घराबाहेर काढण्याचा पर्याय दिला. तेव्हा सदस्यांनी बहुमताने अविनाश मिश्राला एलिमिनेट करण्याचा निर्णय घेतला. पण यामध्ये ‘बिग बॉस’ने जबरदस्त ट्विस्ट आणला. ते म्हणजे अविनाशला घराबाहेर नाही तर थेट जेलमध्ये टाकलं आणि त्याला रेशन वाटपाचा महत्त्वाचा अधिकार देण्यात आला. असाच काहीस जबरदस्त ट्विस्ट पुन्हा एकदा ‘बिग बॉस’ने आणला आहे.

Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal muskan bamne nyra Banerjee Vivian dsena nominated
22 / 30

Bigg Boss 18 : श्रुतिका झाली ‘बिग बॉस’ची लाडकी, तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

मनोरंजन October 23, 2024

Bigg Boss 18 : हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा तिसरा आठवडा सुरू झाला आहे. हा तिसरा आठवडादेखील सदस्यांमधील वादाने सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरात १९व्या दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला. या नॉमिनेशन टास्कमध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळाला. नेमकं काय घडलं? आणि घराबाहेर जाण्यासाठी कोण-कोण नॉमिनेट झालं? जाणून घ्या…

MNS Second List Announced
23 / 30

मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून निवडणुकीच्या रिंगणात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ४५ उमेदवारांचा समावेश आहे. अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. वरळीत संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसे महाराष्ट्रातील २०० ते २२५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. कोथरुडमधून किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Nanand Bhabhi Relation
24 / 30

“भारतीय समाजात नणंद-भावजयांचं नातं खास”, न्यायाधिशांकडून मिश्किल टीप्पणी!

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महिलेने तिच्या भावाच्या पत्नीविरोधात दाखल केलेली तक्रार रद्द केली. दोन्ही पक्षांनी वाद मिटवण्यासाठी करार केला होता. न्यायालयाने नणंद-भावजयांच्या नातेसंबंधाविषयी मिश्किल टिप्पणी केली. न्यायालयाने तक्रार प्रकरण रद्द करताना पक्षकारांना हजार रुपये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे निर्देश दिले. न्यायाधीशांनी नणंद-भावजयांचं नातं वेगळं असतं अशी टिप्पणी केली.

Stree 2 fame Shraddha Kapoor might also join telugu allu arjun much awaited pushpa 2 movie
25 / 30

‘पुष्पा २’ चित्रपटात स्त्रीची एन्ट्री? श्रद्धा कपूर घेणार ‘या’ अभिनेत्रीची जागा

मनोरंजन October 23, 2024

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २ : द रुल' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून या चित्रपटाची फक्त चर्चा सुरू आहे. हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. पण, प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. कारण तेव्हाच 'स्त्री २' आणि इतर चित्रपट प्रदर्शित होतं होते. आता 'पुष्पा २ : द रुल' डिसेंबरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाबाबत नवनवीन अपडेट समोर येत आहेत.

Student Fell From Hotel third Floor
26 / 30

मित्राच्या वाढदिवसाला गेला, कुत्र्यासोबत खेळता खेळता तोल गेला; हॉटेलमध्ये तरुणाचा मृत्यू

हैदराबादच्या चंदनगरमधील व्ही. व्ही. प्राईड हॉटेलमध्ये मित्राच्या वाढदिवसाला आलेला २४ वर्षीय उदय कुमार तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यूमुखी पडला. तो कुत्र्याचा पाठलाग करत असताना खिडकीतून खाली पडला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो जागीच मरण पावला. चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bollywood actor salman khan Dance On Kombadi Palali Song sung by Vaishali made old video viral softnews
27 / 30

‘कोंबडी पळाली’ गाण्यावर सलमान खानचा जबरदस्त डान्स पाहिलात का? जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

मनोरंजन October 23, 2024

Salman Khan Dance On Kombadi Palali Song : बॉलीवूडचा भाईजान सध्या खूप चर्चेत आहे. एकीकडे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणामुळे चर्चेत आहे. अशातच सलमान खानचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे; ज्यामध्ये तो ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

Sandeep Naik Joined Sharad Pawar NCP
28 / 30

“शब्द फिरवला गेला, माझी कोंडी झाली”, तुतारी फुंकताच संदीप नाईकांचे भाजपावर टीकास्र

ठाणे जिल्ह्यातील बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते गणेश नाईक यांचे पुत्र आणि नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी भाजपा सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द पाळला गेला नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. २०१९ च्या निवडणुकीत नाईक कुटुंबीयांनी भाजपात प्रवेश केला होता, परंतु संदीप नाईक यांना तिकीट नाकारले गेले होते.

chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
29 / 30

रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन

चिया सीड्स मानवी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत आणि या बियांचे नियमित सेवन करण्याची शिफारस आरोग्य तज्ज्ञ करतात. या बियांपासून जास्तीत जास्त आरोग्य लाभ मिळविण्यासाठी, त्या बिया खाण्यापूर्वी काही तास भिजवत ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही या बिया पाण्यात किंवा दुधातदेखील भिजवू शकता.

lakhat ek amcha dada fame nitish Chavan dance in 100 episode completed celebration
30 / 30

‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणने केला भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

Lakhat Ek Amcha Dada Serial : अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेता दिशा परदेशी यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका ८ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेतील चार बहिणी आणि एक भावाची कथा प्रेक्षकांच्या अल्पावधीत पसंतीस पडली आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतेच या मालिकेचे १०० भाग यशस्वीरित्या पूर्ण झाले. यानिमित्ताने सेटवर कलाकारांनी जल्लोष केला. या जल्लोषातील एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.