“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान!
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनामुळे चर्चेत आले. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, पण ऐनवेळी माघार घेतली. लासलगावमध्ये मराठा समाजाशी संवाद साधताना त्यांनी प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. "मी थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, शरीर साथ देत नाही," असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.