राज्यात मुख्यमंत्री पदावरून अडलं, राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने स्पष्टच सांगितलं…
राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की, महायुतीला जनतेने यश दिलं आहे आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय लवकरच होईल. पंतप्रधान मोदी, अमित शाह, शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यावर निर्णय अवलंबून आहे.