Raj Thackeray
1 / 30

राज ठाकरेंकडून पहिली यादी जाहीर, राजू पाटील यांंच्यासह ‘या’ शिलेदाराच्या नावाची घोषणा!

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. मनसेने यावेळी महायुतीपासून वेगळी भूमिका घेतली आहे. राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष भोईर आणि शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.

Swipe up for next shorts
Adar Poonawalla Net Worth Car Collection House Property in Marathi
2 / 30

अदर पूनावाला एकूण किती संपत्तीचे आहेत मालक?

अदर पूनावाला यांनी पुण्यातून शालेय शिक्षण घेतल्यानंतर लंडनमध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं. २०११ मध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनल्यानंतर त्यांनी विकसनशील देशांसाठी परवडणारी लस तयार केली. करोना काळात त्यांनी प्रभावी लस तयार करून १७० पेक्षा जास्त देशांना पुरवली. त्यांच्या कुटुंबीयांचं नेटवर्थ १३६ कोटी रुपये आहे. त्यांनी विल्लू पूनावाला चॅरिटेबल फाऊंडेशन स्थापन करून सामाजिक उपक्रम हाती घेतले.

Swipe up for next shorts
supreme court judge sanjay karol pic
3 / 30

“आपण अशा भारतात..”, सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी स्वत: काढलेला फोटो दाखवत…

महिला सशक्तीकरण आणि हक्कांच्या रक्षणावर भारतात वारंवार चर्चा होते, परंतु अनेक महिलांची स्थिती अजूनही सुधारलेली नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय करोल यांनी अधोरेखित केले. त्यांनी एका भाषणादरम्यान २०२३ साली काढलेला फोटो दाखवून बिहार व त्रिपुराच्या दुर्गम भागातील महिलांच्या स्थितीवर भाष्य केले. न्यायमूर्ती करोल यांनी सामाजिक न्याय आणि महिलांच्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयाच्या ठाम भूमिकेचे उदाहरण दिले आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली.

Swipe up for next shorts
Bigg Boss 18 Chahat Pandey Proposed marriage to salman khan
4 / 30

चाहत पांडेने सलमान खानला घातली लग्नाची मागणी, भाईजान म्हणाला, “तुझ्या आईचं आणि…”

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच झालेला वीकेंड वार खूपच जबरदस्त होता. सलमान खानने घरातल्या काही सदस्यांची जेवढी शाळा घेतली तेवढंच हसवलं. शनिवारी ( १९ ऑक्टोबर ) सलमान खानने अरफीन खानला खूप झापलं. अरफीनच्या प्रोफेशनवर अविनाश मिश्राने भाष्य केलं होतं. त्यानंतर अरफीन आणि त्याची पत्नी सारा खान सतत नाराजी व्यक्त करत होते. यावरून सलमानने अरफीनची कानउघडणी केली. यावेळी सलमानने साराबरोबर अजिबात बातचित केली नाही. पण रविवारी, साराबरोबर हसताना, विनोद करताना दिसला. यावेळी चाहत पांडेने थेट भाईजानला लग्नाची मागणीच घातली.

boyfriend died by heart attack
5 / 30

“तिला वाचवा, ती मरेल”, एवढं बोलून प्रियकर कोसळला; रक्ताच्या थारोळ्यात प्रेयसीला पाहून…

दिल्लीतील जगतपुरी भागात एका प्रियकराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ प्रियकर अर्जुनला पाठवला. अर्जुन तिला रुग्णालयात पोहोचवताना स्वतःच हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. प्रेयसीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत आहे. अर्जुनचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

drinking water with food cause gas or indigestion Know from experts
6 / 30

अन्नाबरोबर पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन होऊ शकते का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

पचनाच्या आरोग्याचा विचार केला तर अनेक समज आणि गैरसमज अनेकांच्या मनात असतात. एक सामान्य समज असा आहे की, अन्नाबरोबर किंवा नंतर पाणी प्यायल्याने पोटातील अ‍ॅसिड्स पातळ होऊ शकतात, ज्यामुळे ते अन्न बारीक करण्यास कमी परिणामकारक बनतात, ज्यामुळे पचनशक्ती बिघडते आणि ब्लोटिंग आणि गॅससारख्या इतर समस्या उद्भवतात.

Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
7 / 30

उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एक महिनाही उरलेला नाही. अशातच काँग्रेसच्या सूत्रांकडून बातमी आली की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे, तसेच संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. त्यांनी महाविकास आघाडी एकत्र असल्याचे स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीनेही फडणवीस-ठाकरे भेटीचा दावा केला, मात्र विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Meet Ranbir Kapoor Sister Riddhima Kapoor Husband owns a Rs 252 crore company
8 / 30

रिद्धिमा कपूरचा पती आहे तरी कोण? २५२ कोटींची सांभाळतो कंपनी

गेल्या आठवड्यात 'फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स'चं तिसरं पर्व ( Fabulous Lives of Bollywood Wives Season 3 ) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालं. यामध्ये नीलम कोठारी सोनी, महीप कपूर, भावना पांडे, सीमा सजदेह यांच्यासह रणबीर कपूरची सख्खी बहीण रिद्धिमा कपूर साहनी झळकली आहे. 'फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाइव्स'च्या माध्यमातून रिद्धिमाने वयाच्या ४४व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. त्यामुळे सध्या रणबीर कपूरची बहीण खूप चर्चेत आहे. पण, रिद्धिमा काय काम करते? तिचा पती कोण आहे? जाणून घ्या...

Salman Khan on Bigg Boss 18 shooting amid death threats
9 / 30

बिश्नोई गँगकडून धमक्या अन् बिग बॉस १८चे शूटिंग; सलमान खान स्पष्टच म्हणाला, “कसम खुदा की…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या खुनानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान आणि सिद्दिकी जवळचे मित्र होते. या परिस्थितीतही सलमानने बिग बॉस १८ चे शूटिंग केले. 'वीकेंड का वार'मध्ये सलमानने स्पर्धकांचा समाचार घेतला. चाहत पांडेने सलमानला लग्नासाठी प्रपोज केले, ज्यावर सलमानने हसून उत्तर दिले. सेटवर ६० हून अधिक सुरक्षा कर्मचारी होते.

maratha reservation balaji kalyankar viral video
10 / 30

“तुम्ही स्वत:साठी पक्ष बदलता, पण…”, शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल; जरांगेंचा उल्लेख

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, मविआचे जागावाटप मंगळवारी जाहीर होणार आहे. नांदेडच्या निळा गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. गावकऱ्यांनी त्यांना समाजासाठी काय केले, असा प्रश्न विचारला.

A loud explosion was heard near the CRPF School in Rohini’s Sector 14,
11 / 30

दिल्लीतील स्फोटामागे खलिस्तानी समर्थकांचा गट? टेलिग्राम चॅनेलवरील व्हिडिओमुळे खळबळ!

दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात झालेल्या स्फोटामागे खलिस्तानी समर्थक गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान टेलिग्रामवरील एका चॅनेलवर स्फोटाचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आले आहे. रविवारी सकाळी रोहिणीच्या सेक्टर १४ मधील सीआरपीएफ शाळेजवळ मोठा स्फोट झाला. स्फोटक क्रूड बॉम्ब असल्याचे मानले जात असून, तपासासाठी एनआयए हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.

priyanka chaturvedi praised pm narendra modi
12 / 30

Video: “मोदीजी सर्वात ग्रेट राजकारणी” ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींचा व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. प्रियांका चतुर्वेदींनी मोदींना महान राजकारणी म्हटलं असून, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मोठं यश मिळवलं असल्याचं सांगितलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी या विधानावर प्रतिक्रिया देत प्रत्येक पक्षाला आपले अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

Sohail Khan ex wife Seema Sajdeh is dating Vikram Ahuja
13 / 30

ज्याच्याशी मोडला साखरपुडा, आता त्यालाच डेट करतेय सोहेल खानची एक्स बायको, कोण आहे तो?

'फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाईव्ह्ज'च्या तिसऱ्या सीझनमध्ये सीमा सजदेहने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. सोहेल खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सीमा आता बिझनेसमन विक्रम आहुजाला डेट करतेय. विक्रम हा देवेंद्र आहुजाचा मुलगा असून, १९९० च्या दशकात सीमासोबत त्याचा साखरपुडा झाला होता. विक्रम बॉबी देओलचा मेहुणा आहे. शोमध्ये सीमाने विक्रमची ओळख महीप कपूर, भावना पांडे व नीलमला करून दिली.

mva seat sharing formula news marathi
14 / 30

मविआचं अखेर ठरलं! जागावाटपाबाबत नाना पटोलेंनी जाहीर केला मुहूर्त; म्हणाले, “आम्ही तिघं…”

भारतीय जनता पक्षाने आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यात १३ महिला उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झालेले नसताना भाजपाच्या या यादीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप २२ ऑक्टोबरला जाहीर होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस-शिवसेना (उद्धव ठाकरे) वादावर पटोले यांनी कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले.

Marathi Actor Shashank Ketkar has again raised his voice on the issue of cleanliness
15 / 30

Video: शशांक केतकरने पुन्हा अस्वच्छतेबाबत उठवला आवाज; म्हणाला, “बघू निर्लज्ज कोण आहे”

मराठी मालिकाविश्वातील आघाडीचा अभिनेता शशांक केतकर नेहमी सामाजिक समस्यांविषयी भाष्य करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने फिल्मीसिटी बाहेरील अस्वच्छतेबाबत महापालिकेकडे तक्रार केली होती. त्यानंतर तात्काळ महापालिकेने कारवाई करत फिल्मीसिटी बाहेरील कचरा उचलला. आता शशांकने मालाड येथील मालवणीमधील अस्वच्छतेबाबत आवाज उठवला आहे. शशांक नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…

Maharashtra BJP candidate list 2024 for Legislative Assembly Election 2024 in Marathi
16 / 30

भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर; ९९ जागांसाठी जाहीर केले उमेदवार

भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Kiccha Sudeep Mother Pass Away
17 / 30

कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपच्या आईचं निधन, वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मनोरंजन October 20, 2024

Kiccha Sudeep Mother Pass Away : 'स्पार्शी', 'हचचा', 'कीचा', 'स्वथी मुथू', 'माय ऑटोग्राफ', 'मक्खी' यांसारख्या अनेक चित्रपटातून दमदार अभिनयाने आणि सध्या 'बिग बॉस कन्नड'मधील होस्टिंगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या किच्चा सुदीपच्या घरी दुःखद घटना घडली आहे. किच्चा सुदीपची आई सरोज संजीव यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याचं समोर आलं आहे.

maharashtrachi hasyajatra fame gaurav more met anand shinde photo viral
18 / 30

गौरव मोरेची आनंद शिंदेंबरोबर झाली अचानक भेट, फोटो शेअर करत म्हणाला, “माझं बालपण…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे ( Gaurav More ) सध्या हिंदी सिनेसृष्टीतही चांगलाच सक्रिय झाला आहे. लवकरच गौरव ‘संगी’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात गौरवसह अभिनेता शरीब हाश्मी, संजय बिश्नोई, विद्या मालवडे पाहायला मिळणार आहे. अशातच गौरवची अचानक भेट प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्याबरोबर झाली. या अचानक भेटीचा फोटो गौरवने इन्टाग्रामवर शेअर केला आहे.

Sharad Pawar on Manvat Murders Case
19 / 30

‘मानवत मर्डर्स माझी पहिली केस’, शरद पवारांनी उलगडला १९७२ चा थरारक खटला

शरद पवार यांनी मानवत हत्याकांडाच्या आठवणी उलगडल्या. १९७२ साली गृह राज्यमंत्री असताना, मानवत हत्याकांड घडले. पोलिसांना गुन्हेगार सापडत नसल्याने, पवारांनी रमाकांत कुलकर्णी यांच्याकडे केस सोपवली. कुलकर्णींनी तपासात सातत्य आणि चिकाटी दाखवून गुन्हेगार पकडले, असे शरद पवार म्हणाले.

20 / 30

सिद्धार्थ जाधव लवकरच येतोय धिंगाणा घालायला; ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व सुरू होणार

अभिनेता सिद्धार्थ जाधवने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची विनोदी शैली आणि एनर्जी प्रेक्षकांना खूप आवडते. गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षक सिद्धार्थच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. आता या भन्नाट कार्यक्रमाचं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे.

Mahesh Manjrekar Reaction on Adinath Kothare Paani Movie
21 / 30

‘पाणी’ चित्रपटावर महेश मांजरेकरांनी दिली प्रतिक्रिया अन् आजकालच्या अभिनेत्रींना दिला सल्ला

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’ची कहाणी सांगणारा ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटासह आदिनाथ कोठारेचं कलाकार मंडळी भरभरून कौतुक करत आहेत. नुकतंच ‘पाणी’ चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी महेश मांजरेकर यांनी ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आणि आदिनाथ कोठारेचं तोंडभरून कौतुक केलं.

ladki bahin yojana new update about Decembor Installment
22 / 30

लाडकी बहीण योजना: डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? अदिती तटकरे म्हणाल्या…

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेचा निधी थांबवण्यात आला आहे. मात्र, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने जुलै २०२४ पासून ही योजना सुरू केली असून, आतापर्यंत २ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही योजना बंद होणार नसल्याचे सांगितले आहे.

Premachi Goshta Fame Apurva Nemlekar Share Emotional Post
23 / 30

“डोळ्यातून बांध फुटला…”, वडील आणि भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर झाली भावुक, म्हणाली…

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील सावनी अर्थात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर नेहमी चर्चेत असते. या मालिकेत तिने उत्कृष्ट खलनायिका साकारली आहे. ही खलनायिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. नुकतीच अपूर्वाने वडिलांच्या आणि भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहिली आहे.

yahya sinwar killed video
24 / 30

Video: “मी त्याच्याकडे पाहिलं एक लहान, विचित्र…”, याह्या सिनवारच्या मृत्यूनंतरचा तो प्रसंग

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार शुक्रवारी इस्रायली सैन्याच्या कारवाईत ठार झाला. इस्रायलच्या लष्कराने त्याच्या मृत्यूनंतरचा व्हिडीओ शेअर केला आहे. याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर युद्धबंदीच्या दिशेने सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, इस्रायलच्या नेत्यानाहू यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या रॉकेट हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायल-हमास युद्धाचा शेवट की नव्या युद्धाची सुरुवात, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Remo Dsoza Book for cheating
25 / 30

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझा आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

मनोरंजन October 20, 2024

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसोझासह पाच जणांविरोधात मीरा रोड पोलीस ठाण्यात ११.९६ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. २६ वर्षीय नृत्यिकेने १६ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. २०१८ ते जुलै २०२४ दरम्यान, डिसोझा आणि इतर आरोपींनी नृत्य पथकाच्या बक्षिसाच्या रकमेवर दावा केला होता. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अधिक चौकशी सुरू केली आहे.

Rorschach Movie on OTT
26 / 30

जेव्हा माणूस घेतो आत्म्याकडून बदला, भूतही घाबरतं; हिंमत असेल तरच पाहा OTT वरील हा चित्रपट

ओटीटी October 20, 2024

'रोर्शाक' हा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन निस्साम बशीर यांनी केले आहे. या चित्रपटात मामूटी यांनी ल्यूक अँटनीचे पात्र साकारले आहे, जो आत्म्याशी बदला घेतो. हा चित्रपट 'रोर्शाक' हिंदी भाषेत डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

Ladki Bahin Yojana Ajit Pawar
27 / 30

“तुम्ही बांधलेल्या प्रत्येक राखीची शपथ घेऊन सांगतो की…”; अजित पवारंचं खास आवाहन!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २ कोटी २८ लाख महिलांना सन्मान निधी मिळाला आहे. विरोधकांनी या योजनेवर टीका केली असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांना दिलासा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महिलांना आश्वासन दिले की, योजना बंद होणार नाही. विरोधकांच्या टीकेला उत्तर देत पवार म्हणाले की, महिलांना मिळणाऱ्या निधीमुळे त्यांचे जीवन सुधारत आहे.

Karwa Chauth Fasting what to eat during fasting pre and post fasting for Karwa Chauth 2024
28 / 30

करवा चौथचा उपवास करताय? काय खावं काय खाऊ नये हे कळत नाहीय? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

हेल्थ October 19, 2024

करवा चौथ हा एक पारंपरिक हिंदू सण आहे, जो संपूर्ण भारतातील विवाहित महिलांद्वारे साजरा केला जातो, विशेषतः उत्तरेकडील राज्यांमध्ये. या दिवशी महिलांद्वारे सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो आणि विश्वास असा आहे की, यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते आणि त्यांचे आरोग्य निरोगी होते. जर तुम्ही हा उपवास करण्याची तयारी करत असाल, तर हा उपवास निरोगी आणि आरोग्यदायी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत.

what is brain drain
29 / 30

मुंबईला ‘ब्रेन ड्रेन’चा धोका; पण नक्की हा काय प्रकार आहे? मुंबईवर काय परिणाम होऊ शकतो?

FYI October 19, 2024

मुंबई, भारताची आर्थिक राजधानी, रोजगार आणि व्यवसाय संधींसाठी देशभरातून स्थलांतराचं केंद्र आहे. मात्र, वाढत्या घरभाड्यांमुळे कुशल मनुष्यबळ मुंबई सोडून परवडणाऱ्या ठिकाणी स्थलांतर करतंय. CREDAI-MCHI च्या अहवालानुसार, घरभाड्यांच्या वाढीमुळे ब्रेन ड्रेनची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईतील उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळण्यात अडचणी येतात, ज्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.

Airport and luggage Malaria
30 / 30

विमान प्रवाशांनो सावधान! एअरपोर्ट आणि लगेज मलेरियाचे रुग्ण वाढले; पण नेमकं काय?

युरोपमध्ये एअरपोर्ट आणि लगेज मलेरियाची प्रकरणे वाढत आहेत. Eurosurveillance च्या अभ्यासानुसार, २०१८ ते २०२२ दरम्यान १४५ प्रकरणांपैकी १०५ एअरपोर्ट मलेरिया आणि ३५ लगेज मलेरियाची होती. एअरपोर्ट मलेरिया विमानतळावर संक्रमित डासांमुळे होतो, तर लगेज मलेरिया सामानातून येणाऱ्या डासांमुळे होतो. जागतिक आरोग्य संघटनेने विमान कंपन्यांना निर्जंतुकीकरण प्रक्रियेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.