“एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली जुनी गंमत!
महाराष्ट्रात निवडणुका जाहीर झाल्याने १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज ठाकरे यांनी कल्याण आणि ठाण्यातील प्रचारसभांमध्ये सत्ताधारी पक्षावर टीका केली. त्यांनी पूर्वीच्या आचारसंहितेतील वेळेच्या बंधनांवर भाष्य करताना एक गंमतीशीर अनुभव सांगितला. ते म्हणाले की, पूर्वी एकच कॅमेरा असायचा आणि आम्ही भाषण ताणायचो. आता मात्र दहाच्या आत आटपायला लागतं.