राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीबरोबर जाण्याचा पर्याय निवडू असे म्हटल्याने चर्चांना जोर आला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मनसेने अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि ते महायुतीत सामील होण्याची शक्यता नाही. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर लहान पक्ष आहेत.