अजित पवारांना मोठा धक्का, रामराजे नाईक निंबाळकरांनी मार्ग बदलला; म्हणाले, “इथून पुढे मी…”
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. शरद पवारांच्या सूचक विधानांमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले. रामराजे नाईक निंबाळकर यांनी महायुतीबरोबर काम करण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली आहे.