मुख्यमंत्री पदासाठी महायुतीत खलबतं! संजय शिरसाटांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी खलबतं सुरू आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं असून, अजित पवारांनीही त्याला अनुमोदन दिलं आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी देवेंद्र फडणवीस यांची मैत्रीपूर्ण भेट घेतली असून, कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचं सांगितलं.