“मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभांचा जोर सुरू असताना शरद पवारांनी धाराशिव येथील परांडा येथे भाषण केले. त्यांनी निवृत्तीच्या चर्चेला उत्तर देत "मी म्हातारा झालोय का?" असा सवाल करत उमेदवार आणि मतदारांना प्रोत्साहित केले. पवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत सत्ता परिवर्तनाची गरज व्यक्त केली. त्यांनी इंडिया आघाडीच्या प्रयत्नांची माहिती दिली आणि लोकांना विधानसभा निवडणुकीत बदल घडवण्याचे आवाहन केले.