रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाणार? इंदापूरच्या कार्यक्रमात सूचक विधान!
इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केला. शरद पवारांनी पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले. फलटणच्या कार्यक्रमाबाबत पवारांच्या सूचक विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षांतराची शक्यता वर्तवली जात आहे. पवारांनी आगामी काळात पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले.