“नाद करायचा नाय….”, पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना शरद पवारांचा इशारा; भर सभेत म्हणाले…
शरद पवार : निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार. विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशारा दिला. २०२३ मध्ये पक्षात फूट पडली होती. १९८० सालीही त्यांनी अशाच अनुभवाचा सामना केला होता. तेव्हा सोडून गेलेल्या आमदारांचा पराभव केला होता. "सगळ्यांचा नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही," असं समर्थकांनी म्हटलं.