जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? शरद पवारांचं सूचक विधान काय?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अवघा एक महिना उरला आहे. महायुतीने सरकारचं रिपोर्ट कार्ड सादर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा सांगण्याचं आव्हान दिलं. शरद पवारांनी जयंत पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी असल्याचं सांगितलं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांना योग्य मानलं. त्यामुळे जयंत पाटील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? याची चर्चा रंगली आहे.