लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा आहे. सरकार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देते, निवडणुकांनंतर ही रक्कम २१०० रुपये होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. विरोधकांनी ३००० रुपये देण्याचे आश्वासन दिले. शरद पवारांनी या योजनेचा मतदारांवर फारसा परिणाम होणार नाही असे म्हटले. त्यांनी राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांवरही भाष्य केले.