सुप्रिया सुळेंचं लग्न कसं जमलं? बाळासाहेब ठाकरेंसह माजी पंतप्रधांनांची कशी होती भूमिका?
सुप्रिया सुळे यांनी लल्लनटॉपशी बोलताना त्यांच्या लग्नाची कहाणी सांगितली. बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांच्या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावली. चंद्रशेखर यांनी सुप्रियाच्या आईच्या सांगण्यावरून सदानंद सुळे यांना फोन केला होता. सदानंद यांनी सुरुवातीला हा फोन मस्करी समजला. नंतर सुप्रियाने चंद्रशेखर यांची माफी मागितली. सुप्रिया सुळे यांनी राजकीय आणि वैयक्तिक नात्यांबद्दलही चर्चा केली.