बहुमतानंतरही मुख्यमंत्री पदाचा पेच कायम; २०१९ चा उल्लेख करत सुप्रिया सुळेंची टीका
महाराष्ट्रात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं असूनही सरकार स्थापन झालेलं नाही. भाजपाने १३२, शिंदेसेनेने ५५, आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ४० जागा जिंकल्या आहेत. मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुतीवर टीका करताना शेतकऱ्यांच्या हितावर घणाघात झाल्याचं सांगितलं. २०१९ प्रमाणेच २०२४ मध्येही कमिटमेंटचा प्रश्न निर्माण झालाय.