supriya sule viral audio clip
1 / 30

Video: “ते रेकॉर्डिंग आल्या आल्या मी सगळ्यात आधी…”, सुप्रिया सुळेंची व्हायरल क्लिपवर…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंवर भाजपाने बिटकॉइन व्यवहारांद्वारे निवडणुकीसाठी निधी जमा केल्याचा आरोप केला आहे. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी ऑडिओ क्लिप्सचा संदर्भ देत हे आरोप केले. सुप्रिया सुळेंनी हे आरोप फेटाळून लावले असून, सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, सुधांशु त्रिवेदींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Swipe up for next shorts
Amit thackeray meet Sada sarvankar
2 / 30

सिद्धिविनायक मंदिरात माहिमचे उमेदवार आमने-सामने; अमित ठाकरेंच्या कृतीने वेधलं लक्ष

राज्यात मतदानाला सुरुवात झाली असून सर्वपक्षीय उमेदवार मतदानासाठी बाहेर पडले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर आमने-सामने आहेत. सिद्धिविनायक मंदिरात दोघेही भेटले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अमित ठाकरेंनी सरवणकरांच्या खिशातील धनुष्यबाण सरळ करून सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी बाप्पाकडे काहीही मागितले नसल्याचे सांगितले.

Swipe up for next shorts
Maharashtra Election 2024 Prajakta Mali Sonali Kulkarni Hemant Dhome marathi actors actress first to cast vote
3 / 30

“आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं…”, मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, म्हणाले..

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आर्या आंबेकर, हेमंत ढोमे, रवी जाधव, सायली संजीव, मंदार चांदवडकर, तेजस्विनी पंडित, सुनील बर्वे, अभिजीत केळकर अशा अनेक मराठी कलाकारांनी मतदानाचं कर्तव्य पार पडलं आहे. यासंदर्भात मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

Swipe up for next shorts
Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election 2024
4 / 30

ऐन निवडणुकीत सोन्याच्या दरात पुन्हा तेजी! नेमकं किती रुपयांनी महागलं; वाचा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणू २०२४ साठी आज (२० नोव्हेंबर) रोजी सर्वत्र मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवसापासूनच देशात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली. सोन्याचे दर आज ७६ हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. १९ नोव्हेंबच्या तुलनेत आज सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नाही, मात्र १८ आणि १९ नोव्हेंबरच्या तुलनेत हे दर जवळपास १२०० रुपयांनी वाढले आहेत. आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ….

Sharad pawar and Supriya sule
5 / 30

निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून बिटकॉइनचा वापर? शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे नाना पटोले यांच्यावर परकीय चलन व बिटकॉइन वापरल्याचे आरोप करण्यात आले. हे आरोप माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी केले असून भाजपाचे सुधांशू त्रिवेदी यांनी पुरावे सादर केले. शरद पवारांनी हे आरोप फेटाळले असून सुप्रिया सुळे यांनीही निराधार असल्याचे सांगत मानहानीचा खटला दाखल करण्याची घोषणा केली.

Jharkhand Assembly Election 2024 Voting Updates
6 / 30

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सत्ताधारी आघाडीसमोर भाजपाचं तगडं आव्हान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ३८ जागांवर मतदान सुरू झाले आहे. ५२८ उमेदवार रिंगणात असून, १ कोटी २३ लाख ५८ हजार १९५ लोक मतदान करतील. सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत मतदान होणार आहे. सत्ताधारी जेएमएम-काँग्रेस युतीचा सामना भाजपा आणि ऑल झारखंड स्टुडंट्स यूनियनशी आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.

PM Narendra Modi
7 / 30

राज्यात मतदानाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मतदारांना मराठीतून आवाहन, म्हणाले….

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ९ कोटी ७० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस आहे. ९९० संवेदनशील केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. लोकसभा निवडणुकीतील गोंधळ टाळण्यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे.

BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur (2)
8 / 30

Video: ‘विवांता हॉटेल’मध्ये नेमकं काय घडलं? विनोद तावडेंवरील आरोपांनंतर भाजपाच्या…

भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर बहुजन विकास आघाडीने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. विवांता हॉटेलमध्ये तावडे असताना पैसे वाटपाची डायरी सापडल्याचा दावा करण्यात आला. यावर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले. त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने या प्रकरणात कारवाईची शक्यता वर्तवली आहे.

bhagare guruji son akhilesh bhagare unseen video viral
9 / 30

हळद, संगीत, सप्तपदी अन् बरंच काही…; भगरे गुरुजींच्या मुलाच्या लग्नातील Unseen व्हिडीओ पाहा

लोकप्रिय पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा मुलगा अखिलेश भगरेचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. ग्रहयज्ञ, हळद, साखरपुडा, संगीत, सप्तपदी असा समारंभपूर्वक अखिलेशचं लग्न झालं. अखिलेशने वैष्णवी जाधव हिच्याशी लग्नगाठ बांधली. याचे फोटो आणि व्हिडीओ अखिलेशची बहिणी म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur
10 / 30

आरोप-प्रत्यारोपानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी विरारच्या हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. यामुळे हॉटेलमध्ये गोंधळ झाला आणि पोलिसांनी हॉटेल सिल केले. आमदार क्षितीज ठाकूर घटनास्थळी उपस्थित होते. विनोद तावडे मुंबईला रवाना झाले, परंतु हितेंद्र ठाकूर यांनी त्यांना मदत केली. हितेंद्र ठाकूर यांनी एएनआयशी बोलताना या घटनेवर स्पष्टीकरण दिले.

Savalyachi Janu Savali fame Sulekha Talwalkar share story of Vandana Gupte in her marriage
11 / 30

कपाळावर टिकली नव्हती म्हणून वंदना गुप्तेंनी…; सुलेखा तळवलकरांनी सांगितला किस्सा

‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी ‘सावळ्याची जणू सावली’ मालिका सुरू झाली आणि अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. सध्या मालिकेत सारंग आणि सावलीच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. नक्की कोणाचं लग्न कोणाशी होणार? हे पाहणं उत्सुकतेचं आहे. या लग्नसोहळ्यानिमित्तानेच मालिकेतील कलाकार मंडळी विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधत आहेत. याच वेळी मालिकेतील तिलोत्तम मेहेंदळे म्हणजेच अभिनेत्री सुलेखा तळवलकर यांनी स्वतःच्या लग्नातला एक किस्सा सांगितला.

reena roy reacted sonakshi sinha looks like her
12 / 30

सोनाक्षी सिन्हा तुमच्यासारखी दिसते; असं विचारल्यावर रीना रॉय म्हणालेल्या…

बॉलीवूड अभिनेत्री रीना रॉय यांचं सोनाक्षी सिन्हासारखं दिसणं हा निव्वळ योगायोग आहे, असं रीना यांनी एका मुलाखतीत सांगितलं. रीना रॉय यांनी ७०-८० च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. त्यांचं शत्रुघ्न सिन्हासोबतचं नातं चर्चेत होतं, पण ते वाईट पद्धतीने संपलं. नंतर रीना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं, पण तेही फार काळ टिकलं नाही.

Anil Deshmukh injured after attack on car in Nagpur
13 / 30

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच अनिल देशमुखांचा सत्ताधाऱ्यांना इशारा; म्हणाले, “मी…”

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर काटोल येथे सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला आहे.

Supriya sule on vinod Tawade
14 / 30

“विनोदजी, मला धक्का बसलाय की…”, तावडेंवर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे हॉटेलमध्ये गोंधळ झाला आणि पोलिसांनी हॉटेल सिल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपावर टीका करत विचारले की, नोटबंदी करूनही भाजपाकडे एवढी रोख रक्कम कशी आली? तावडे यांनी आरोप फेटाळले आहेत.

Lakhat Ek Amcha Dada fame isha Sanjay and swapnil kanase dance video viral
15 / 30

Video: ‘लाखात एक…’ मालिकेतील पुड्या आणि राजश्रीचा जबरदस्त डान्स, सूर्यादादा म्हणाला…

Lakhat Ek Amcha Dada: ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. हे कलाकार जितके कामामुळे चर्चेत असतात. तितकेच ते त्यांच्या डान्स व्हिडीओमुळेही चर्चेत असतात.

BJP Leader Vinod Tawde Money Distribution Allegations by BVA leader Hitendra Thakur
16 / 30

Video: मला भाजपावाल्यांनीच विनोद तावडेंबद्दल सांगितलं – हितेंद्र ठाकूर

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 'कॅश फॉर वोट्स' प्रकरणात भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला. विरार पूर्वमधील हॉटेल विवांतामध्ये तावडे उपस्थित असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि क्षितिज ठाकूर यांनी त्यांना घेराव घातला. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडूनच माहिती मिळाल्याचा दावा केला. तावडे यांनी २५ वेळा फोन करून माफी मागितल्याचेही ठाकूर म्हणाले.

Crime Thriller Web Series On Prime Video
17 / 30

‘मिर्झापूर’पेक्षाही दमदार ‘या’ सीरिज प्राइम व्हिडीओवर आहेत उपलब्ध, तुम्ही पाहिल्यात का?

प्राइम व्हिडीओवरील 'मिर्झापूर' ही क्राईम थ्रिलर वेब सीरिज खूप लोकप्रिय आहे. याशिवाय, 'अफसोस', 'बम्बई मेरी जान', 'रीचर', 'ब्रीद' आणि 'द फॅमिली मॅन' या सीरिजही प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत. 'अफसोस'मध्ये आत्महत्येचे प्रयत्न, 'बम्बई मेरी जान'मध्ये गँगस्टर कथा, 'रीचर'मध्ये ॲक्शन, 'ब्रीद'मध्ये प्रिय व्यक्तीचे रक्षण आणि 'द फॅमिली मॅन'मध्ये मनोज बाजपेयी यांचा अभिनय पाहायला मिळतो.

Stop rubbing your eyes now, doctor says it can be harmful
18 / 30

डोळे चोळण्याची तुमची सवय आताच करा बंद! तज्ज्ञांनी सांगितला हा धोका

Stop Rubbing Your Eyes: आपल्यापैकी अनेकांना वारंवार डोळे चोळण्याची सवय असते. हे जरी धोकादायक वाटत नसले तरी फिजिकल थेरपिस्ट डॉ. आकिब जमालसारखे तज्ज्ञ याची शिफारस करत नाहीत. त्यांच्या मते, डोळ्यांच्या आजूबाजूला जोरजोरात चोळण्यापेक्षा थोड्या प्रमाणात हलक्या दबावाने चोळणे चांगले. पण असे का?

Women Candidates List Maharashtra Assembly Election 2024
19 / 30

लाडक्या बहिणींच्या राज्यात महिला उमेदवारांची संख्या कमी

महाराष्ट्राच्या ६७ वर्षांच्या इतिहासात ४६१ महिला आमदार झाल्या आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत २५० हून अधिक महिला उमेदवार आहेत, जे एकूण उमेदवारांच्या ६-७% आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार १००० पुरुषांमागे ९२९ महिला मतदार होते, तर २०२४ मध्ये हा रेशो ९३६ आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने प्रत्येकी ३० महिला उमेदवारांना संधी दिली आहे. २०१९ मध्ये ४५ महिला उमेदवारांपैकी फक्त २४ जिंकल्या होत्या. सप्टेंबर २०२३ मध्ये ३३% महिला आरक्षणाचा ठराव पास झाला आहे.

vinod tawde money distribution viral vivanta hotel
20 / 30

“विनोद तावडेंनी मला २५ वेळा फोन केले आणि…”, हितेंद्र ठाकूर यांचा मोठा दावा; पैसे वाटपाच्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. विरारच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत. ठाकूर यांनी तावडेंनी २५ वेळा फोन करून माफी मागितल्याचा दावा केला आहे. भाजपाने हे आरोप निवडणुकीतील पराभवाच्या भीतीमुळे केलेले असल्याचे म्हटले आहे.

tusshar Kapoor filmy career
21 / 30

वडील सुपरस्टार, पण ‘या’ अभिनेत्याने २३ वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये दिले १९ फ्लॉप चित्रपट

जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर २३ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत सक्रिय आहे. त्याने 'मुझे कुछ कहना है' या सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केले, मात्र त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. 'क्या कूल हैं हम' आणि 'गोलमाल' हे त्याचे काही हिट चित्रपट आहेत. तुषारच्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास १९ चित्रपट फ्लॉप झाले आहेत. आगामी चित्रपटांमध्ये 'वेलकम टू जंगल' आणि 'कपकपी' यांचा समावेश आहे.

Sharayu toyota
22 / 30

श्रीनिवास पवारांच्या शरयू टोयोटामध्ये पैशांचं वाटप? ECच्या सर्च ऑपरेशनमध्ये काय सापडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या शरयू टोयोटा कंपनीत निवडणूक आयोगाने तपासणी केली. पैशांच्या वाटपाची तक्रार मिळाल्याने ही तपासणी झाली, परंतु काहीही आढळले नाही. युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार यांनी तपासणीला सहकार्य केले आणि निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी घडत असल्याचे सांगितले.

Abhishek Bachchan shares touching memory of daughter Aaradhya
23 / 30

“खूप झालंय आता, मला…”; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन असं का म्हणाला?

अभिषेक बच्चन शूजित सरकार दिग्दर्शित 'आय वॉन्ट टू टॉक'मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेकने मुलगी आराध्याबरोबरची आठवण सांगत 'मदत' या शब्दाची महत्त्वता स्पष्ट केली. चित्रपटातील अर्जुन पात्राशी याचा संबंध जोडला. शूजित सरकार व अभिषेक पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अभिषेक व ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा आहेत.

Parineeti Chopra and Raghav Chadha received a special anniversary gift from the actor's mother Reena Chopra
24 / 30

लेक-जावयासाठी परिणीती चोप्राच्या आईने रेखाटलं सुंदर चित्र, राघव चड्ढा सासूबाईंना म्हणाले…

अभिनेत्री परिणीती चोप्राचं गेल्यावर्षी २४ सप्टेंबरला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्न झालं. परिणीती आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला १ वर्ष २ महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्ताने परिणीती आणि राघव चड्ढा यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत. यानिमित्ताने परिणीतीची आई रीना चोप्रा यांनी देखील दोघांना खास भेटवस्तू दिली. सध्या याची चांगली चर्चा सुरू आहे.

Gharoghari Matichya Chuli fame Reshma shinde and rutuja kulkarni on o pilaga venkati song
25 / 30

Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकीचा जाऊबाईबरोबर दाक्षिणात्य लोकगीतावर भन्नाट डान्स

सोशल मीडियावर नेहमी विविध भाषांमधील गाणी ट्रेंड होतं असतात. त्यामुळे युजरसह कलाकार मंडळी ट्रेंडिंग गाण्यावर रील करत असतात. त्यानंतर ही गाणी अधिक हिट होतात. गेल्या काही महिन्यांपासून ‘ओ पिलगा व्यंकटी’ नावाच तेलुगू लोकगीत खूप ट्रेंड होतं आहे. या गाण्यातील हूकस्टेपने सगळ्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. याच ट्रेंड होतं असलेल्या तेलुगू लोकगीतावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने जाऊबाई अवंतिकाबरोबर म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीबरोबर भन्नाट डान्स केला आहे.

Rahul Rai success story Gamma Point Capital founder Rahul rai career in crypto currency now working at BlockTower Capital
26 / 30

पाच महिन्यांत कमावले २८६ कोटी, आयआयटी सोडून धरली ही वाट; वाचा राहुल रायच्या यशाचं सीक्रेट

करिअर November 19, 2024

यश कधीच सहजासहजी मिळत नाही. आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर यशाचा सुखद अनुभव घेता येतो. त्यात शिक्षणाचा वाटादेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. जितकं चांगलं शिक्षण तितका करिअरसाठी चांगला वाव, असं म्हणतात. पण एका आयआयटी ड्रॉपआउटनं ते सहज शक्य करून दाखवलंय. अखंड मेहनत आणि धाडसी निर्णयामुळे राहुल राय यानं अवघ्या पाच महिन्यांत २८६ कोटी कमावून दाखवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ राहुल रायचा प्रेरणादायी प्रवास…

Sanjay Raut on Anil Deshmukh attack
27 / 30

“आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना…”, संजय राऊतांना संशय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. राऊतांनी भाजपाच्या काळात कायदा सुव्यवस्थेची स्थिती खराब असल्याचा आरोप केला. देशमुखांचे पूत्र सलील काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, आणि प्रचारादरम्यान ही घटना घडली.

Bigg Boss 18 karan veer Mehra Vivian dsena avinash Mishra chahat pandey digvijay rathee kashish Kapoor nominated
28 / 30

Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

बिग बॉसच्या १८व्या पर्वात १६ दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर दोन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली. त्यानंतर आता एक-दोन नव्हे तर आणखी तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली आहे. अदिती मिस्त्री, एडिन राज, यामिनी मल्होत्रा या तिघीजणी वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. याआधी ‘बिग बॉस’च्या सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला. यामध्ये नेमकं काय घडलं? कोण सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले? जाणून घ्या…

Keerthy Suresh to marry longtime boyfriend Antony Thattil
29 / 30

१५ वर्षांपासून दुबईच्या बिझनेसमनबरोबर रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री गोव्यात करणार लग्न

मनोरंजन November 19, 2024

दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच तिच्या बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलशी लग्न करणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. अँटनी दुबईत राहतो आणि दोघे १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. कीर्तीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आणि 'महानती' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. ती वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' चित्रपटात दिसणार आहे, जो २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल.

Dilip Joshi reacts on his fight with Asit Modi
30 / 30

‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांशी भांडणाच्या वृत्तांवर दिलीप जोशींनी सोडलं मौन; म्हणाले…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे मुख्य कलाकार दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात भांडण झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, सेटवर दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर धरली होती. मात्र, दिलीप जोशी यांनी या अफवा फेटाळल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, अशा खोट्या बातम्यांमुळे त्यांना आणि प्रेक्षकांना त्रास होतो. दिलीप जोशी यांनी शो सोडण्याच्या अफवाही खोट्या असल्याचे सांगितले.