मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा; भाजपा धक्कातंत्र अवलंबणार?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू झाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा आहे. तरीही केंद्रीय नेतृत्वाने सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात याबाबत चर्चा झाली. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही नवे नेतृत्व आणण्याचा विचार होऊ शकतो.