आता विमानतळ आणि एसटी स्टॅण्डवरही ‘या’ १३ गावांमध्ये संस्कृत; काय आहे ही योजना?
संस्कृत भाषेचा प्रचारप्रसार करण्यासाठी उत्तराखंड सरकारने आता एक नवी योजना सुरू केली आहे. राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (१५ एप्रिल) ‘आदर्श संस्कृत गाव कार्यक्रमा’स मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एका गावात संस्कृत भाषा शिकवली जाणार आहे. उत्तराखंडमध्ये संस्कृत ही राज्याची दुसरी अधिकृत भाषा आहे.