पाकिस्तानचे पहिले राष्ट्रगीत हिंदू कवीने लिहिले?आताच वाद कशासाठी?
अलीकडेच दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या न्यूज १८ रायझिंग भारत समिटमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भूविज्ञान विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी फारशा चर्चेत नसलेल्या एका ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख केला. ते म्हणाले, १४ ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तानला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी जे राष्ट्रगीत गायलं गेलं ते एका हिंदू कवीने म्हणजेच जगन्नाथ आझाद यांनी लिहिलं होतं.