Hindi compulsory in Maharashtra: हिंदीची सक्तीही आता मराठीच्या मूळावर? कारणे काय?
मराठीला महाराष्ट्रात तरी स्थान मिळालंय का?.. असा प्रश्न आज समाजाच्या अनेक स्तरांमधून विचारला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून मराठीला होणारा उघड विरोध..कधी भर बाजारात तर कधी वेगवेगळ्या कंपन्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मराठी भाषेचा वापर करणार नाही, असं छातीठोकपणे सांगितलं जात आहे. मात्र, आता त्याच वादात तेल ओतण्याचे काम राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि भाजपा त्रि-भाषा धोरणाचा अवलंब का करत आहे? याचाच घेतलेला हा आढावा.