‘शाही जामा मशीद’ ते ‘जुमा मशीद’; संभल येथील मशिदीबाहेरचा फलक ASI का बदलणार?
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने संभल येथील मशिदीबाहेरचा फलक बदलण्याचा निर्णय घेतला असून, आता या वास्तूला ‘शाही जामा मशीद’ऐवजी ‘जुमा मशीद’ या नावाने संबोधलं जाणार आहे. एखाद्या मशिदीचे नाव शाही असावे की धार्मिक कार्याशी संबंधित असावे. हा वाद केवळ भाषिक फरक नाही, तर तो ऐतिहासिक दस्तऐवज, धार्मिक संवेदनशीलता आणि सामाजिक जाणिवा या तीनही अंगांना स्पर्श करणारा मुद्दा आहे.