सोन्या- चांदीच्या दरात मोठे बदल, तुमच्या शहरात आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर किती? वाचा
Today’s Gold Silver Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या- चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर ७८, ६९० रुपयांवर असलेला सोन्याचा दर आज ७९, ५२० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर ९२ हजारांवरुन आता ९३ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास २४ कॅरेट सोन्याचा दर ८३० रुपयांनी वाढला आहे, तर १ किलो चांदीचा दर ९२,६०० वरुन ९२,९२० रुपयांवर पोहोचला आहे.