नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोन्या- चांदीचा भाव जाणून घ्या.
नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोन्या- चांदीचा भाव जाणून घ्या.
अजित पवारांचे समर्थक आणि आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत अपमानजनक वक्तव्य केले आहे. मुलींच्या लग्नाबाबत केलेल्या विधानावरून त्यांच्यावर टीका झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या वक्तव्याची दखल घेऊन नाराजी व्यक्त केली आणि भुयार यांना कानउघाडणी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही भुयार यांच्यावर टीका केली, हे वक्तव्य महिलांचा आणि कृषी क्षेत्रातील लोकांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले.
‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित झाला आणि १३ दिवसांत चांगली कमाई केली. अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटाने १३ दिवसांत १७.९२ कोटींची कमाई केली ईहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर यांच्यातील एक विजेता ठरणार आहे. अभिजीत सावंतच्या आई आणि सासूबाईने प्रेक्षकांना मत देण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वरच्या दिशेने चाललेला मुंबई शेअर बाजार आज अडखळला. गुरुवारी सकाळी सेन्सेक्स ८४५ अंकांनी घसरला, तर निफ्टी २७० अंकांनी खाली आला. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या घोषणांमुळे बाजारात अस्थिरता आहे. अमेरिकेतील आर्थिक स्थिती आणि उत्पादन क्षेत्रातील बदलांचा भारतीय बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत टेक कंपन्यांच्या शेअर्सनी बाजाराला आधार दिला, तर जपानमध्ये शेअर्सचे दर वाढले. मध्य-पूर्व आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.
'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत लीला एजेच्या प्रेमात पडली आहे आणि लवकरच ती हे प्रेम व्यक्त करणार आहे. जहागीरदार कुटुंब क्रूझवर फिरायला गेलं आहे, तिथे लीला आपल्या भावना एजेंना सांगणार आहे. अशातच दुसऱ्याबाजूला लीला-रेवतीच्या डान्स व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दोघींच्या डान्सचं नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.
सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्री वनिता विजयकुमार चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. ४३ वर्षीय वनिताने सोशल मीडियावर तिच्या चौथ्या लग्नाची घोषणा केली. ती प्रसिद्ध कोरिओग्राफर रॉबर्टशी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी लग्न करणार आहे. वनिताचे यापूर्वी तीन लग्नं झाली होती, परंतु ती टिकली नाहीत.
भाजपा नेते बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर विनेश फोगट चर्चेत आली. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या विनेशने पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीआधी अपात्र झाल्यामुळे पुन्हा चर्चेत आली. आता ती काँग्रेसकडून हरियाणातील जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. विनेशने देश सोडण्याचा विचार केला होता, पण प्रियांका गांधींनी समजावल्यामुळे निर्णय बदलला.
इराणने १ ऑक्टोबरला इस्रायलवर २०० मिसाईल्स डागल्याने इस्रायल-हेझबोलाह संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेने इस्रायलची बाजू घेतली आहे. या संघर्षात वर्षभरात ४० हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. हमास नेता इस्माइल हनियाची हत्या आणि हेजबोल्लाह नेता हसन नसरल्लाहच्या मृत्यूनंतर संघर्ष वाढला आहे. इस्लामिक देशांनी इस्रायलविरोधात एकजूट केली आहे, तर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी इस्रायलच्या बाजूने आहेत. भारताने शांततेची भूमिका घेतली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधला. मात्र, विनेश फोगटने अपात्र ठरल्यानंतर मोदींशी बोलण्यास नकार दिला. विनेशने सांगितले की, मोदींनी संवादाच्या अटी ठेवल्या होत्या, ज्यात व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा समावेश होता. विनेशने या अटींना विरोध केला आणि आपल्या भावनांची चेष्टा होऊ नये असं वाटलं म्हणून बोलण्यास नकार दिला.
मंगळवारी इराणने इस्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. बहुतांश क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी इस्रायलला इशारा दिला की, इस्रायलने तेहरानच्या राष्ट्रीय संपत्तीवर हल्ले थांबवले नाहीत तर इराण पुन्हा हल्ला करेल. हेझबोलाच्या प्रमुखाच्या मृत्यूनंतर इराणने बदला घेण्याची शपथ घेतली होती. राजदूतांनी नेतान्याहू यांना २१ व्या शतकातील हिटलर असे संबोधले.
अनन्या पांडे सध्या विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित CTRL सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिने ब्रेकअप झाल्यावर एक्स बॉयफ्रेंडचे फोटो जाळल्याचा खुलासा केला. आता ती ब्रेकअप्स समजुतदारपणे हाताळते. गॅलाटा इंडियाशी बोलताना अनन्याने ब्रेकअप स्वीकारण्याचं महत्त्व सांगितलं. विक्रमादित्य मोटवानी यांनीही प्रेमभंगाचा सामना करणं महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. अनन्या आणि आदित्य रॉय कपूरचं मे महिन्यात ब्रेकअप झालं.
काँग्रेस नेते राहुल गांधी ४, ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. ५ ऑक्टोबर रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी अभिवादन करून संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली.
हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रचारात जातीय समीकरणांचा प्रभाव दिसून आला. २०१० च्या मिर्चपूर घटनेचा उल्लेख करून भाजपाने काँग्रेसवर 'दलितविरोधी' ठपका ठेवला आहे. मिर्चपूरमध्ये जाट आणि दलित समुदायांमध्ये तणाव आहे. शेतकरी आंदोलनामुळे भाजपाविरोधी मतप्रवाह तयार झाला आहे. अग्निवीर योजनेवरूनही जनतेमध्ये नाराजी आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला होणार आहे. अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि सूरज चव्हाण या सात सदस्यांपैकी एक विजयी होणार आहे. शिव ठाकरेच्या एन्ट्रीमुळे घरातील सदस्यांचा प्रवास प्रेक्षकांना दाखवला जात आहे. निक्की आणि अभिजीतच्या एक व्हिडीओ व्हायरल होतं असून नेटकरी दोघांना ट्रोल करत आहेत.
लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकांवर त्याचे पडसाद दिसत आहेत. हरियाणातील गढी-सांपला किलोई मतदारसंघात भाजपाच्या मंजू हुड्डा चर्चेत आहेत. माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. मंजू हुड्डा यांच्या पतीवर गुन्हेगारीचे आरोप आहेत, तरीही त्या पतीच्या पाठीशी ठाम आहेत. भाजपाने त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे.
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री खुशबू तावडे दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. खुशबूने 'सारं काही तिच्यासाठी' मालिका सोडली होती, तेव्हा ती गर्भवती असल्याचं समोर आलं होतं. खुशबूचं २०१८ साली अभिनेता संग्राम साळवीशी लग्न झालं. त्यांचा पहिला मुलगा राघव आता ३ वर्षांचा आहे.
सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या 'इशा फाऊंडेशन'विरोधात माजी प्राध्यापक एस. कामराज यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या मुलींना ब्रेनवॉशिंग करून संन्यासी जीवन जगण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असून, इशा फाऊंडेशनने हे आरोप फेटाळले आहेत. फाऊंडेशनने स्पष्ट केले की, अध्यात्म व योगाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांची स्थापना झाली असून, संन्यास घेणे ही वैयक्तिक निवड आहे.
१ ऑक्टोबरला सकाळी गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला. परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून त्याला ही गोळी लागली. या घटनेच्या वेळी गोविंदा घरी एकटाच होता. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा कोलकाता येथे होती. जसं तिला गोविंदाला गोळी लागल्याचं समजलं तसं ती मुंबईला रवाना झाली. मुंबईत पोहोचताच आज सकाळी-सकाळी सुनीताने रुग्णालयात जाऊन गोविंदाची भेट घेतली. त्यानंतर गोविंदाच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली.
नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, ज्यात गरभा-दांडिया आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो. उत्तर भारतात 'रामलीला' विशेष लोकप्रिय आहे. यंदा मिस युनिव्हर्स इंडिया २०२४ रिया सिंघा रामलीलेमध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. मनोज तिवारी रामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिया सिंघा १८ वर्षांची असून, ती अहमदाबादची फॅशन डिझायनर आहे.
अभिनेता गोविंदाला १ ऑक्टोबरला त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यामुळे सध्या गोविंदाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी कुटुंबीय आणि कलाकार रुग्णालयात जात आहेत. कृष्णा अभिषेकने सोशल मीडियावर मामाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिली आहे.
'देवरा: पार्ट १' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. २७ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सोमवारी १२.७५ कोटींची कमाई केली होती, तर मंगळवारी १३.५ कोटींची कमाई केली. आतापर्यंत एकूण १८६ कोटींची कमाई झाली असून जगभरात ३४० कोटींचा गल्ला जमवला आहे. जान्हवी कपूरने या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी इराणला इशारा दिला आहे की, इराणने इस्रायलवर २०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागून मोठी चूक केली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आप्तकालीन सायरन वाजविण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. नेत्यानाहू यांनी इराणला प्रत्युत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे.
महिला सशक्तीकरण आणि महिलांचे हक्क यावर चर्चा होत असताना, काही प्रकरणांमध्ये महिलांकडून कायद्यांचा गैरवापर होत असल्याचे दिसून येते. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात महिलेला फटकारले आणि तिची याचिका फेटाळली. न्यायमूर्ती निधी गुप्ता यांनी कलम १२५ चा गैरवापर अमान्य केला आणि महिलेला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम असल्याचे नमूद केले.
सप्टेंबर महिन्यात अनेक सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज झाले. आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'द ट्राइब', 'गोट', 'सीटीआरएल', 'अमर प्रेम की प्रेम कहानी' आणि 'द सिग्नेचर' हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. 'गोट' ३ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर, 'सीटीआरएल' आणि 'अमर प्रेम की प्रेम कहानी' ४ ऑक्टोबरला अनुक्रमे नेटफ्लिक्स आणि जिओ सिनेमावर, 'द ट्राइब' प्राइम व्हिडीओवर, आणि 'द सिग्नेचर' झी 5 वर रिलीज होणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचा दावा केला आहे. तसेच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटल्याचेही सांगितले आहे. या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. वंचित बहुजन आघाडीने ही माहिती जनतेला दिली आहे.
एका कंपनीत तीन महिन्यांपासून एकही कर्मचारी नियुक्त न झाल्याने व्यवस्थापकाने युक्ती केली. त्यांनी नाव बदलून स्वतःचा बायोडेटा सादर केला, जो काही सेकंदातच नाकारला गेला. यामुळे व्यवस्थापकाला एचआर विभागातील त्रुटी आढळल्या. अखेर, एचआरला कामावरून काढण्यात आलं. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा अंतिम आठवडा सुरू झाला आहे. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी हे अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. निक्कीने तिकीट टू फिनालेचा टास्क जिंकून पहिली फायनलिस्ट ठरली आहे. अशातच निक्की आणि अंकितामध्ये जेवणावरून वाद झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार सोहळा झाला. शरद पवार यांनी आपल्या भाषणात शिंदे यांच्या संघर्षमय वाटचालीचे कौतुक केले. शिंदे यांनी पोलीस शिपायापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली.
२० सप्टेंबरला प्रदर्शित झालेला 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सचिन पिळगांवकर निर्मित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, स्वप्नील जोशी यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. पहिल्या आठवड्यात १४.३६ कोटींची कमाई करत, चित्रपटाने एकूण १८.५७ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचं बजेट ८ कोटी असून, चार दिवसांतच बजेट वसूल केलं आहे.