Gold Silver Price Today 8 October 2024 in Marathi
1 / 30

निवडणूक निकालापूर्वी सोने-चांदीचे दर गडगडले, नेमकं किती रुपयांनी झाले स्वस्त

देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या सणासुदीच्या हंगामात तुम्ही सोने - चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसांत उच्चांक गाठलेल्या सोने- चांदीच्या दरात आज निवडणूक जम्मू काश्मीर, हरियाणा विधानसभा निकालापूर्वी घसरण झाली आहे. बाजार सुरु होताच सोन्याच्या दर १५० रुपयांनी तर चांदी तब्बल १०२० रुपयांनी स्वस्त झाली आहे.आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

Swipe up for next shorts
swapnil kusale father pc
2 / 30

स्वप्नील कुसाळेच्या वडिलांचा शिंदे सरकारवर आरोप;म्हणाले,”सामान्य कुटुंबातला असल्यामुळेच..”

कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून इतिहास घडवला. महाराष्ट्र सरकारने त्याला एक कोटींचं बक्षीस जाहीर केलं, पण त्याचे वडील सुरेश कुसाळे यांनी पाच कोटींचं बक्षीस मागितलं आहे. त्यांनी राज्य सरकारवर पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. स्वप्निलच्या आगामी खर्चासाठी अधिक आर्थिक मदतीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

Swipe up for next shorts
The AI-Dharma Story Trailer
3 / 30

लेकीला वाचवण्यासाठी एआयच्या विळख्यात अडकलेला बाबा, पुष्कर जोगच्या सिनेमाचा दमदार ट्रेलर

‘द एआय धर्मा स्टोरी’ हा मराठी चित्रपट आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या फायद्या-तोट्यांवर भाष्य करतो. वडील-मुलीच्या भावनिक नात्यावर आधारित हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. पुष्कर जोग दिग्दर्शित या चित्रपटात पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, दीप्ती लेले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये एआयच्या साहाय्याने फेक व्हिडीओ बनवून मुलीचे अपहरण दाखवले आहे. चित्रपटात हॉलिवूड टच आणि अनेक ॲक्शन सिक्वेन्स आहेत.

Swipe up for next shorts
Jahnavi killekar sister in law said I would have beat you
4 / 30

बिग बॉसमधून आलेल्या जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात सूरज चव्हाण विजेता ठरला, तर जान्हवी किल्लेकर टॉप ६ मध्ये होती. शो संपल्यानंतर जान्हवीने तिच्या वागणुकीमुळे कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. तिने स्पष्ट केले की तिच्या चुकीचा दोष फक्त तिचा आहे, कुटुंबाचा नाही. तिच्या जाऊबाईने तिला माफ केले आणि तिच्या चांगल्या वागणुकीबद्दल अभिमान व्यक्त केला.

alana panday bralette video chikki panday (1)
5 / 30

Video: “शर्ट घालायला विसरलीस का?” ब्रालेट घालून बसलेल्या अभिनेत्रीला वडिलांचा सवाल

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेने 'द ट्राइब' शोमधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अलाना सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर असून, तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिचे वडील चिक्की पांडे तिच्या कपड्यांवर कमेंट करतात. अलाना लॉस एंजेलिसमध्ये पती आयव्हर मॅक्रेसोबत राहते. 'द ट्राइब' शो प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Kiran Mane answer to those who criticized Suraj Chavan for winning
6 / 30

“कुरूप वेडा ठरवू नका”, सूरज जिंकला म्हणून टीका करणाऱ्यांना किरण मानेंचं जबरदस्त उत्तर

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणचं सध्या सर्वत्र कौतुक होतं आहे. मराठी कलाकारांसह राजकारणातील दिग्गज मंडळी सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत. पण दुसऱ्याबाजूला अनेकजण नाराज आहेत. सहानुभूतीमुळे सूरज जिंकला असं म्हणत टीका करत आहेत. याच टीकाकारांना अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने यांनी आपल्या पोस्टमधून जबरदस्त उत्तर दिलं आहे.

Jahnavi Killekar says If that had not happened, I would have been the winner of Bigg Boss Marathi Season 5
7 / 30

“जर तसं झालं नसतं तर ‘बिग बॉस मराठी ५’ची विजेती मी असते”, जान्हवी किल्लेकरचं विधान

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा ६ ऑक्टोबरला पार पडला. अंतिम सहा स्पर्धकांमध्ये सूरज चव्हाणने विजेतेपद मिळवले. जान्हवी किल्लेकरने नऊ लाखांची रक्कम घेऊन खेळ सोडला, ज्यामुळे तिच्या निर्णयाचं कौतुक होतं आहे. अशातच तिने एक विधान केलं आहे. ज्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे.

Katrina kaif wearing black patch arm fitness glucose levels benefits expert tips
8 / 30

नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, तज्ज्ञांनी केला खुलासा

Katrina Kaif black patch: केरळच्या कोची येथे नवरात्रीच्या उत्सवात कतरिना कैफने अलीकडेच हजेरी लावली होती. तरुण ताहिलियानी साडीत ती अतिशय सुंदर दिसत होती. या सगळ्यात कतरिनाच्या हातावरील एका काळ्या पॅचने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अनेकांना प्रश्न पडला की हा पॅच नेमका काय आहे?

कतरिना कैफ फिटनेस पॅचसह दिसल्याने पॅचची प्रासंगिकता आणि तो प्रत्येकाने वापरावा की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही वैद्यकीय सल्ला घेतला.

All Women Service Centre by Schwing Stetter
9 / 30

आता सिमेंट मिक्सरची पिवळी यंत्रे महिला दुरुस्त करणार

पुरुषांची मक्तेदारी मोडून महिलांनी विविध क्षेत्रांत सेवा बजावली आहे. श्विंग स्टेटर इंडिया कंपनीने चेन्नई येथे पहिलं सर्व महिला सेवा केंद्र सुरू केलं आहे, जिथे १७ महिला तंत्रज्ञ कार्यरत आहेत. कंपनीचे लक्ष्य २०४७ पर्यंत सर्व विभागांमध्ये ५०% महिलांना संधी देणे आहे. या केंद्रात महिलांना वसतिगृह, बस सेवा आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनसारख्या सुविधा पुरवल्या जातात.

Suraj Chavan Said This Thing About His X Girl Friend
10 / 30

‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता सूरज चव्हाण याचं राज्यभरात कौतुक होतं आहे. अंतिम फेरीत ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्या गुलिगत धोका आणि झापूकझुपूक ट्रेंडचं कौतुक होतं आहे. एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का, या प्रश्नावर सूरजने तिला स्वीकारणार नसल्याचं सांगितलं कारण तिचं लग्न होऊन तिला मूल झालं आहे. सूरजने आपल्या यशाचं श्रेय आई-वडिलांच्या आशीर्वादाला दिलं आहे.

sharad pawar ramraje naik nimbalkar
11 / 30

रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात जाणार? इंदापूरच्या कार्यक्रमात सूचक विधान!

इंदापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केला. शरद पवारांनी पाटील यांना विधानसभेत पाठवण्याचे आवाहन केले. फलटणच्या कार्यक्रमाबाबत पवारांच्या सूचक विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पक्षांतराची शक्यता वर्तवली जात आहे. पवारांनी आगामी काळात पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले.

Suraj chavan wedding plans
12 / 30

सूरज चव्हाणला करायचंय लग्न, अपेक्षा सांगत म्हणाला, “साडी नेसणारी हवी, कारण…”

बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. विजयानंतर सूरजने आनंद व्यक्त केला आणि ट्रॉफीची रोज पूजा करणार असल्याचे सांगितले. बक्षिसाच्या रकमेने घर बांधणार आणि उरलेले पैसे बँकेत ठेवणार आहे. लग्नाबद्दल विचारल्यावर सूरजने शिकलेली, साधी आणि गावाकडची मुलगी हवी असल्याचे सांगितले. सूरजला पाच बहिणी आहेत आणि त्याचे आई-वडील नाहीत. टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध झाल्यानंतर त्याला बिग बॉसची ऑफर मिळाली आणि ७० दिवसांच्या प्रवासानंतर तो विजेता ठरला.

Navratri 2024 Fasting Tips in Marathi
13 / 30

Navratri Fasting Tips : नवरात्रीचा उपवास करताना ‘या’ महत्त्वाच्या टिप्स ठरतील फायदेशीर

अनेक जण नवरात्रीचा उपवास करताना काही पदार्थ वर्ज्य करतात; तर काही लोक फक्त सात्त्विक आहार घेतात. पण, उपवास करताना खालील टिप्सचे अनुसरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Success Story of Dr. Arokiaswamy Velumani founder of Thyrocare Technologies who built 3000 crore company
14 / 30

परिस्थिती नव्हती पण जिद्द होती, जाणून घ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास

कष्ट करून आपल्या पोटाची खळगी भरणारे लोक कधी सुखाचे चार दिवस येतील याची वाट पाहत असतात. गरिबीच्या झळा सोसूनही आपलं ध्येय आणि स्वप्न साकार करण्यासाठी अगदी जीवाचं रान करणारे लोकच यशस्वी होतात. ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करताना अखंड मेहनत व सातत्य राखले, तर आपण शून्यातूनही विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. अशाच गरिबीच्या खातेऱ्यात असतानाही अपार कष्टातून तीन हजार कोटींचा व्यवसाय उभारणाऱ्या वेलुमणी यांचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेणार आहोत.

Kolkata Rape and Murder Case What CBI Said?
15 / 30

“संजय रॉयने डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या..” सीबीआयचं चार्जशीट दाखल

कोलकाता येथील आर. जी. कर महाविद्यालयात ९ ऑगस्टला एका ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली असून, सीबीआयने चार्जशीट दाखल केली आहे. शवविच्छेदन अहवालात पीडितेच्या शरीरावर २५ जखमा आढळल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि डीएनए पुराव्यांमुळे संजय रॉय दोषी ठरला. पीडितेच्या पालकांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांवर गुन्हा लपवण्याचा आरोप केला आहे.

Ankita Walawalkar on Suraj chavan win bigg boss marathi
16 / 30

सूरज चव्हाण Bigg Boss Marathi जिंकल्यावर अंकिता वालावलकर म्हणाली, “मिळालेलं…”

सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. त्याच्या विजयानंतर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंढरीनाथ कांबळेने सूरजला टास्क समजावून सांगितले आणि त्याला अडचण येऊ नये म्हणून मदत केली. विजयानंतर पंढरीनाथने फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले. सूरजला १४.६ लाख रुपये मिळाले असून तो या पैशांमधून घर बांधणार आहे.

Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan
17 / 30

“१० वर्ष नाटक करून…”, सूरज जिंकल्यावर अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “हा झापूक झुपूक बोलून…”

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा महाविजेता जाहीर करताना ‘कलर्स मराठी’चे हेड्स देखील उपस्थितीत होते. तेव्हा प्रोगोमिंग हेड केदार शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली. सूरजला घेऊन एक चित्रपट करणार असल्याचं केदार शिंदेंनी सांगितलं. या चित्रपटाचं नाव ‘झापुक झुपूक’ असणार आहे. ही सूरजसाठी एक सुवर्णसंधी आहे. याच पार्श्वभूमीवर एका मराठी अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

sharad pawar harshavardhan patil
18 / 30

शरद पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार; व्यासपीठावरूनच म्हणाले, “यांना विधानसभेत पाठवा!”

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपचे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केले. शरद पवारांनी त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवार म्हणून जाहीर केले. पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले आणि आगामी १४ ऑक्टोबरला फलटणमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे सूचित केले.

Hero bike offers diwali discount on bike and scooters of Hero MotoCorp
19 / 30

डिस्काउंटसाठी दिवाळीची वाट पाहताय? हिरो देतेय ‘या’ बाईक्स आणि स्कूटरवर भरघोस सूट

ऑटो 24 hr ago

सणासुदीला अनेक लोक नवी-कोरी बाईक घ्यायच्या विचारात असतात. जर तुमचाही टू-व्हीलर घ्यायचा विचार सुरू असेल, तर ‘हीरो’ने तुमच्यासाठी आनंदाची बातमी आणली आहे. ‘हीरो मोटोकॉर्प’ने दिवाळीपूर्वीच आपल्या बाईक आणि स्कूटरवर मोठ्या सवलतीच्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज भासणार नाही. ‘हीरो’च्या अनेक मॉडेल्सवर ही सूट दिली जात आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होऊ शकतो.

supriya sule on harshavardhan patil joins ncp sharad pawar
20 / 30

पूर्वीचे वाद विसरून हर्षवर्धन पाटलांसोबत काम कसं होणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “इतक्या…”

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केला. पूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूरमध्ये मदत न मिळाल्याचा आरोप केला होता. पण आज सुप्रिया सुळेंनी पाटील यांच्या प्रवेशावर आनंद व्यक्त केला आणि पूर्वीच्या वादांना विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन केले.

Jitendra Awhad For Suraj Chavan
21 / 30

“आई मरी मातेच्या मंदिराबाहेर उभा राहून…”, जितेंद्र आव्हाडांची सूरज चव्हाणसाठी पोस्ट

बारामतीजवळच्या मोढवे गावातील सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी जिंकली. गरीब कुटुंबातील सूरजने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि विजेता ठरला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्याचं अभिनंदन करत संघर्षाची कहाणी सांगितली. सूरजने १४.६ लाख रुपये आणि इतर बक्षिसं जिंकली. त्याच्या विजयाने महाराष्ट्राला अभिमान वाटतो, असं आव्हाड म्हणाले.
Lalu Prasad Yadav and Tejswi Yadav
22 / 30

लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांची मुले तेजस्वी आणि तेज प्रताप यादव यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. यादव रेल्वेमंत्री असताना अपात्र उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या मोबदल्यात जमिनी मिळवल्याचा आरोप आहे. सीबीआयने या प्रकरणात ७७ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. पुढील सुनावणी २३ आणि २४ ऑक्टोबरला होणार आहे.

What Raj Thackeray said?
23 / 30

राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल, “देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची राजकीय भाषा…”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. यावेळी त्यांनी राजकारणातील खालावलेल्या भाषेवर टीका केली. त्यांनी साहित्यिकांना राजकारण्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं. महाराष्ट्राच्या राजकीय भाषेचा स्तर खालावल्यामुळे तरुण पिढीला चुकीचं राजकारण समजतंय, असं त्यांनी सांगितलं. साहित्यिकांनी सामाजिक चळवळ उभी करून राजकारण्यांना खडे बोल सुनावावेत, असा सल्ला त्यांनी दिला.

president draupadi murmu in udaipur
24 / 30

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावर भाजपा खासदाराचा आक्षेप; पतीच्या वडिलांची भेट न घेतल्यावरही नाराजी

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या राजस्थान दौऱ्यावर भाजपाच्या महिला खासदार महिमा कुमारी मेवाड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राष्ट्रपतींच्या सिटी पॅलेस भेटीमुळे त्यांच्या पदाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा केला आहे. सिटी पॅलेसवर कायदेशीर वाद चालू असल्याने राष्ट्रपतींनी तिथे भेट देणं अयोग्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी राष्ट्रपतींना दौरा रद्द करण्याची विनंतीही केली होती.

What Nitin Gadkari Said?
25 / 30

“तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, एकेकाला गोळ्या…”; नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांच्या तरुणपणीच्या नक्षलवादी चळवळीतील अनुभवाचा किस्सा सांगितला. त्यांनी वन अधिकाऱ्यांना धमकी दिल्याने रस्त्याचे काम वेगाने पूर्ण झाले. गडकरींनी सरकारची व्याख्या सांगताना म्हटले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही म्हणजे सरकार. त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.

Raj Thackeray in Pune for Marathi Sahitya Parishad
26 / 30

राज्यातील काही लोकांना जाळ्या नसलेल्या इमारतींवरून उड्या मारायला लावल्या पाहिजेत – ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला संबोधित करताना आजच्या साहित्यिक आणि कवींवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी राजकारण्यांवरही टीका केली आणि मराठी साहित्य वाढवण्याची हमी दिली. राज ठाकरे म्हणाले की, आजच्या साहित्यिकांमध्ये पूर्वीची ठणकावून सांगण्याची हिंमत कमी दिसते.

Bigg Boss Marathi Season 5 Winner Utkarsh Shinde make news song for suraj Chavan
27 / 30

सूरज विजयी होताच उत्कर्ष शिंदेचं जबरदस्त गाणं, लिहिली मार्मिक पोस्ट; म्हणाला…

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. तर उपविजेता अभिजीत सावंत झाला. त्यामुळे सध्या सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे. पण एकाबाजूला अभिजीत विजयी न झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. फक्त प्रेक्षक नाहीतर काही कलाकार मंडळींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. अशातच अभिनेता, गायक, संगीतकार, डॉ. उत्कर्ष शिंदेने सूरजवर केलेलं जबरदस्त गाणं चांगलंच व्हायरल होतं आहे.

Abhijeet sawant Birthday Celebration Video
28 / 30

Bigg Boss Marathi 5चा उपविजेता अभिजीत सावंतच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन पाहिलंत का?

बिग बॉस मराठी ५ चा उपविजेता अभिजीत सावंतचा आज वाढदिवस आहे. शोच्या ग्रँड फिनालेनंतर त्याने कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला आणि व्हिडीओ शेअर केला. त्याने बिग बॉसच्या प्रवासात पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. अभिजीतने पत्नी शिल्पा व मुलींबरोबर केक कापला आणि चाहत्यांचे प्रेम हीच खरी ट्रॉफी असल्याचे म्हटले. मेघा धाडे आणि चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

BJP Harshavardhan Patil Joined Sharadchandra Pawar NCP in Marathi
29 / 30

“हा जनतेचा उठाव” म्हणत हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात; झोपेबाबतच्या ‘त्या’ विधानावर म्हणाले

कधीकाळी काँग्रेसचे इंदापूरमधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील भाजपात गेले होते, परंतु आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश केला आहे. निवडणुकांआधी पक्षबदल केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. पाटील यांनी जनतेच्या आग्रहामुळे पक्षबदल केल्याचे सांगितले. इंदापूरमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय अद्याप ठाम नाही, परंतु पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

explosion that caused injuries and destroyed vehicles at outside the Karachi airport, Pakistan,
30 / 30

हल्ला की अपघात? पाकिस्तानच्या कराचीत स्फोटामुळे चिनी कामगारांचा मृत्यू

पाकिस्तानच्या कराची विमानतळाबाहेर रविवारी झालेल्या स्फोटात दोन चिनी कामगार ठार झाले आणि आठजण जखमी झाले. पोर्ट कासिम इलेक्ट्रिक पॉवर कंपनीच्या चिनी कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर रात्री ११ वाजता हल्ला झाला. स्फोटाचे स्वरूप अद्याप स्पष्ट नाही. चिनी दूतावासाने या स्फोटाला "दहशतवादी हल्ला" संबोधले असून, सखोल चौकशीची मागणी केली आहे.