“व्यापार कराच्या पार्श्वभूमीवर RBI तीनवेळा रेपो दरात करणार कपात”, अर्थतज्ज्ञांचा अंदाज
अमेरिकेने भारतावर लादलेल्या व्यापार करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सिटीबँकच्या अर्थतज्ज्ञांनी यंदा तीनवेळा ७५ बेसिस पॉइंट्सने रेपो रेट कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीमध्ये रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६.२५% केला. अमेरिकेच्या करामुळे २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढीवर ४० बेसिस पॉइंट्सने परिणाम होऊ शकतो. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे.