Sensex Today: सेन्सेक्स उसळला! ८५ हजारांचा विक्रमी टप्पा पार, निफ्टीनंही गाठला उच्चांक!
मुंबई शेअर बाजारात मंगळवारी सकाळी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ८५ हजारांचा टप्पा ओलांडत ८५,०४३.४४ अंकांपर्यंत उसळी घेतली, ज्यामुळे गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा फायदा झाला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये ५० पॉइंटने घट केल्याचा परिणाम बाजारावर दिसला. निफ्टी५०नेही विक्रमी कामगिरी करत २५,९७८.९० अंकांची नोंद केली.