आठवड्याभरात कसे बदलले सोन्या-चांदीचे दर; आज २४ कॅरेटचा रेट काय आहे? इथे करा चेक
सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत, यात सोन्या-चांदीच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आठवड्याभरात सोन्याचा दरात जवळपास ५२० रुपयांची वाढ झाली आहे. आज १५ डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला, गेल्या आठवड्याच्या शेवटी हाच दर ७६,७३० रुपये प्रति १० ग्रॅम होता, त्यामुळे सोन्याच्या दरात कमी अधिक प्रमाणात का होईन वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र चांदीच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे, आज १ किलो चांदीचा दर ९०,९४० रुपये आहे, हाच दर आठवड्याभरापूर्वी ९२,३४० रुपये होता.