रॅपिडो ते मनी व्ह्यू… २०२४ मध्ये ‘या’ स्टार्टअप कंपन्यांची बिलियन डॉलर क्लबमध्ये एन्ट्री
देशात स्टार्टअप्स कंपन्या वेगाने प्रगती करीत आहेत; पण या वेगाने विकसित होणाऱ्या स्टार्टअप्स कंपन्यांमध्ये टिकून राहणे ही आव्हानात्मक बाब आहे. तसेच यातही १ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणे ही त्याहून प्रतिष्ठेची बाब आहे. कारण- त्यातून केवळ स्टार्टअप कंपनीचे आर्थिक यशच दिसत नाही, तर स्टार्टअपचा बाजारातील प्रभाव अन् एक चांगले नेतृत्व दिसून येते. या वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये २०२४ अनेक युनिकॉर्न स्टार्टअप्स कंपन्या सुरू झाल्या, ज्यांनी वर्षभरात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त केले आणि बाजारपेठेला एक आकार दिला.