लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी योग्य वेळ कोणती? पाहा A टू Z माहिती
lalbaugcha raja 2024 All Updates : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबईत वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात अनेक मंडळांच्या गणरायाच्या आगमन सोहळ्याला सुरुवातदेखील झाली आहे. यंदा गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या कालावधीत साजरी केली जाईल. हा भव्य उत्सव, ज्याला विनायक चतुर्थी असेही म्हणतात. हा उत्सव बुद्धी आणि समृद्धीची देवता, भगवान गणेशाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा होतो.