लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळात अनंत अंबानी ‘या’ पदावर नियुक्त, मोठी जबाबदारी खांद्यावर
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने अनंत अंबानी यांची कार्यकारी मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेतला गेला आहे. अंबानी कुटुंबाने मंडळाला रुग्ण सहाय्य निधी आणि २४ डायलिसिस मशीन दिल्या आहेत. अनंत अंबानी यांच्या नियुक्तीमुळे मंडळाची प्रतिष्ठा वाढेल, अशी अपेक्षा आहे.