“मिरवणुकीत गणवेशात नाचू नका, नाहीतर…”, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी; कारवाईचा इशारा!
मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात गणेशोत्सव 2024 साजरा होत आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी असून, घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. राज्यभरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना गणवेशात नृत्य करण्यास मनाई केली आहे. मुंबईत १२ हजार सार्वजनिक व २ लाख २४ हजार घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होत आहे.